विदर्भासह देशातल्या २२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भासह देशातल्या २२ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांमध्ये विदर्भासह देशातल्या 22 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) व्यक्त केलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, ता. 8 सप्टेंबर : येत्या दोन दिवसांमध्ये विदर्भासह देशातल्या 22 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) व्यक्त केलीय. पावसापासून सुरक्षीत राहण्यासाठी काही उपाययोजनाही NDMA नं जाहीर केल्या आहेत. ओडिसा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये पुढचे दोन दिवस 25 ते 45 किमी वेगाने वारे वाहतील असा अंदाजही व्यक्त केलाय. गेली काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर हा अंदाज आल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याच्या अहवालाचा आधार घेत NDMA ने मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, ओडिशा, आसाम, मेघालय, नगालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल चा काही भाग, सिक्किम, झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, कोंकण, गोवा, विदर्भ आणि तेलंगाना मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

NDMA लोकांना प्राथमिक उपचार किट, टॉर्च, बाटली बंद पानी, कोरडे खाद्य पदार्थ, सोबत बाळगण्यास सांगितलं आहे. पूरग्रस्त भागात मुलांना तलावाच्या जवळ जाऊ देवू नका असा इशाराही विभागानं दिला आहे. पाळीव प्राण्यांना मोकळं न सोडता सुरक्षीत ठेवा, पूल, नदी, नाले ओलांडताना काळजी घ्या असा इशाराही NDMA नं दिला आहे.

 

First published: August 7, 2018, 11:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading