महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा रेड अलर्ट, धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे महापुराचा धोका

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा रेड अलर्ट, धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे महापुराचा धोका

पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण, कर्नाटकच्या किनारी भागात, राजस्थान, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आता एनडीआरएफची टीम अनेक गावांमध्ये दाखल झाले आहे. अशात ठाणे, रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रेदश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर पुढच्या काही दिवस कायम असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अनेक गावांना आणि शहरांना सतर्कतेचा उशारा देण्यात आला आहे.

पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण, कर्नाटकच्या किनारी भागात, राजस्थान, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर मुसळधार पावसामुळे कोकणातला पूर अद्याप कमी झालेला नाही. जगबुडी नदीची पाणी पातळी कमी झाली असली तरी राजापूर शहरात अजूनही पाणी भरलेलं आहे. सिंधुदुर्गातही मसुरे गावात पाणी भरलं आहे. हायवेवर अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे महामार्ग बंद करण्यात आले आहेत. तर रायगडमध्ये महाड शहराला महापुराचा विळखा पडला आहे. महाड-पुणे रस्त्यावरील वरंध घाटामध्ये माझेरी गावाजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अद्याप या ठिकाणी जेसीबी पाठवण्यात आला नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

इतर बातम्या - आई-वडिलांचा होता स्पष्ट नकार, तरीदेखील सुषमा स्वराज यांनी केला प्रेमविवाह

असा असेल मुंबईत पाऊस...

रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाने थैमान खातलं आहे.

कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता...

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण आणि गोव्यामध्ये बुधवारी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर पुढच्या काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

भयंकर! पाण्याच्या लोंढ्याने क्षणांत रस्ता वाहून नेला; भूस्खलनाचा LIVE VIDEO

या जिल्ह्यांता महापुराचा धोका वाढला...

- रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. महाड शहरात 8 ते 9 फूट पुराचं पाणी शिरलं आहे. बिरवाडी आसनपोई गावातील 200 पेक्षा अधिक लोकांना NDRF टीमने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ढगफुटी सारखी परिस्थिती झाली आहे.

- रायगडमध्ये महाड शहर, आसनपोई , बिरवाडी भागातील 250 नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली असून महाड, पोलादपूर, माणगाव, तळा तालुक्यातील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.

- सांगली जिल्ह्यात महापुराची स्थिती गंभीर बनली आहे. सांगलीतील 100 पेक्षा जास्त गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणच्या 41 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तर कृष्णा नदीनेही 52 फुटांची पातळी गाठली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.

- कोल्हापूरमध्ये राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 54 फुट 10 इंच इतकी आहे. (धोकादायक पातळी 43 फूट) त्यामुळे एकुण 111 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. तर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सांगली नाक्याजवळ बंद करण्यात आला आहे.

VIDEO: कोल्हापुरात पावसाचा हाहाकार; एनडीआरएफची टीम घटनास्थळी

Published by: Renuka Dhaybar
First published: August 7, 2019, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading