खुशखबर! इंटरनेटचा स्पीड वाढणार; भारताचा सर्वात वजनदार उपग्रह अवकाशात झेपावणार

खुशखबर! इंटरनेटचा स्पीड वाढणार; भारताचा सर्वात वजनदार उपग्रह अवकाशात झेपावणार

इस्रोनं निर्माण केलेला सर्वांत वजनदार सॅटेलाईट बुधवारी अवकाशात झेपावणार आहे. याच्या प्रक्षेपणानंतर भारतात ब्रॉडबँड सेवेचा विस्तार वाढेल आणि इंटरनेटचा स्पीड आणखी वाढणार असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने म्हटलंय.

  • Share this:

3 डिसेंबर, नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)द्वारा निर्मित, सर्वात वजनदार जीसॅट-11 या उपग्रहाचं प्रक्षेपण बुधवार 5 डिसेंबर रोजी फ्रेंच गियानाच्या उड्डाण केंद्रावरून होणार आहे. 5854 किलोग्राम वजन असलेल्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर भारतात ब्रॉडबँड सेवा अहज उपलब्ध होईल, शिवाय इंटरनेटचा वेगसुद्धा वाढणार असल्याचं ISRO ने म्हटलंय.

ISRO द्वारा निर्मित आतापर्यंतच्या सर्व उपग्रहांमध्ये जीसॅट-11 हा उपग्रह सर्वाधिक वजनदार असून, तो पुढल्या पिढीचा ‘हाय थ्रूपुट’ संचार उपग्रह असल्याचं ISRO ने म्हटलंय. या उपग्रहाचं प्रक्षेपण 25 मे रोजीच होणार होतं. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे उपग्रहाचं प्रक्षेपण लांबणीवर पडलं. येत्या बुधवारी अंतराळात झेपावणाऱ्या भारताच्या जीसॅट-11 या उपग्रहासोबत कोरियन अंतराळ आंशोधन केंद्राचा एक उपग्रह देखील प्रक्षेपित केला जाणार आहे.

गेल्या आठवड्यात ‘इस्रोने (PSLV) C-43 च्या माध्यमातून एकाच वेळेस 31 उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले. PSLV ची या वर्षातली ती सहावी झेप होती. पृथ्वीचं निरिक्षण करणारा भारतीय HYSIS या उपग्रहसह अन्य 30 असे एकूण 31 उपग्रह एकाच वेळेस इस्रोने प्रक्षेपित केले. त्यात 23 उपग्रह हे केवळ अमेरिकेचे होते.

 VIDEO : पोहरा देवी येथील जाहीर सभेत काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

First published: December 3, 2018, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading