या कारणामुळे भारतात कमी होणार नोकऱ्या

या कारणामुळे भारतात कमी होणार नोकऱ्या

हवामान बदल आणि तापमानवाढीचा फटका पूर्ण जगाला बसतो आहे. भारतातही यावर्षी उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळाली. या वाढत्या उष्म्यामुळे आरोग्यावर तर परिणाम होणारच आहे पण याचा परिणाम नोकऱ्यांवरही होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 जुलै : हवामान बदल आणि तापमानवाढीचा फटका पूर्ण जगाला बसतो आहे. भारतातही यावर्षी उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळाली. या वाढत्या उष्म्यामुळे आरोग्यावर तर परिणाम होणारच आहे पण याचा परिणाम नोकऱ्यांवरही होणार आहे.

वाढत्या उष्णतेमुळे 2030 पर्यंत भारतात 3 कोटी 40 लाख नोकऱ्या कमी होतील, असा अंदाज आहे. उष्णतेमुळे हीट स्ट्रेसचा त्रास होतो. या हीट स्ट्रेसचा काम करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. याच कारणामुळे जगभरातल्या लोकांची उत्पादकता कमी होणार आहे. जगभरातल्या नोकऱ्यांमध्ये घट होणार असून या नोकऱ्या 8 कोटींवर येतील, असा अंदाज आहे.

भारतालाही या उष्माघाताचा फटका बसण्याचा धोका आहे, असं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालात म्हटलं आहे. भारतात बहुतांश लोकसंख्या शेती आणि उत्पादन क्षेत्रावर अवलंबून आहे. उत्पादन क्षेत्रातच मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याने अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात. भारताच्या तुलनेत चीनचं मात्र कमी नुकसान होईल, असं हा अहवाल सांगतो.

VIDEO : सावधानतेचा इशारा ! पुढील 48 तासांत कोसळ'धार'

दिल्लीजवळच्या भागात वेगाने उष्णता वाढत आहे. उर्वरित भारताशी तुलना केली तर या भागातलं तापमान सुमारे 8 टक्क्यांनी जास्त होतं. आयआयटी दिल्लीनेच याबाबत संशोधन केलं आहे.

हवामान बदल आणि तापमानवाढीचा सगळ्यात जास्त फटका शेतीलाही बसणार आहे. वाढत्या उष्म्यामुळे शेतीची उत्पादकता सुमारे 9 टक्क्यांनी खाली येईल, असं तामिळनाडूचे शेतीशास्त्रतज्ञ आर. मणी यांनी म्हटलं आहे. भारताच्या GDP मध्ये शेतीचा वाटा 15 टक्के आहे. अशा स्थितीत शेतीचं उत्पन्न कमी झाल्यास त्याचा परिणाम GDPवर होऊ शकतो. शेती आणि उत्पादन क्षेत्राला जर याचा जास्त फटका बसणार असेल तर भारतावर बेरोजगारीचं संकट येण्याचा धोका आहे.

=====================================================================================================

VIDEO : यांच्या धाडसाला सलाम ! जीव धोक्यात घालून पुरातून आजीला काढलं बाहेर

First published: July 2, 2019, 8:58 PM IST

ताज्या बातम्या