Home /News /national /

Weather Forecast : देशात पुढच्या पाच दिवसांमध्ये उष्णतेची लाट, प्रचंड गरम होणार, राजधानी दिल्ली ते यूपी सूर्य आग ओकणार

Weather Forecast : देशात पुढच्या पाच दिवसांमध्ये उष्णतेची लाट, प्रचंड गरम होणार, राजधानी दिल्ली ते यूपी सूर्य आग ओकणार

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा (Heat Wave) जाणवू लागला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील तापमान पाच दिवस वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून (IMD ALERT) सांगण्यात आले आहे.

  नवी दिल्ली, 14 मे : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा (Heat Wave) जाणवू लागला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील तापमान पाच दिवस वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून (IMD ALERT) सांगण्यात आले आहे. रविवारी दिल्लीचे (Delhi temperature) कमाल तापमान 46 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान 5 दिवसांत पाऊस पाडणार नसल्याचंही हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  रविवारी दिल्लीतील तापमान 46 अंशांच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस तापमान कमालीचे वाढणार असून, त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा (heat wave) त्रास जाणवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी असानी चक्रीवादळामुळे (asani cyclone) दिल्लीत थोडासा गारवा होता, परंतु कालपासून उष्णतेच्या झळा पुन्हा जाणवू लागल्या आहेत.

  हेही वाचा : 'मुख्यमंत्र्यांनी इंडियातून बाहेर पडून भारतात यावं'; शेतकरी आत्महत्यांवरुन सदाभाऊ खोत यांची जोरदार टीका

  हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहिले आहे. शनिवारी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस आणि रविवारी 46 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 29-31 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

  त्यांनी नागरिकांनी दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन केले. दुपारच्या दरम्यान उष्णतेत मोठी वाढ होत असल्याने शक्यतो दुपारी बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उष्णतेची लाट आणि मध्यम वाऱ्यामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मधील हवा सुद्धा खराब झाली आहे.

  या राज्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे राहणार

  गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्येही पुढचे 5 दिवस कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, जयपूर, लखनौ आणि गाझियाबादमध्ये 40 अंशांच्या पुढे तापमान नोंदवले जाण्याची शक्यता आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज किमान तापमान 31 अंश आणि कमाल तापमान 45 अंश असू शकते. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये किमान तापमान 26 अंश आणि कमाल तापमान 43 अंश राहण्याची शक्यता आहे.

  27 मे दरम्यान मान्सून दाखल होणार

  मेच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. दरम्यान यंदा चार दिवस आधीच पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार 13 ते 19 मे दरम्यान म्हणजेच वेळेआधी मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर केरळमध्ये 20 ते 26 मेपर्यंत पाऊस दाखल होईल. तर तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Weather forecast, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या