मराठी बातम्या /बातम्या /देश /

Weather Forecast : आज 25 शहरांमधील तापमान राहणार 40 अंशापेक्षा जास्त; कशी असेल तुमच्या शहरातील स्थिती?

Weather Forecast : आज 25 शहरांमधील तापमान राहणार 40 अंशापेक्षा जास्त; कशी असेल तुमच्या शहरातील स्थिती?

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वाढत्या तापमानाने जनता हैराण झाली आहे. (Heat Increasing in India) शनिवारी यावर्षी प्रथमच ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. त्याचबरोबर किमान तापमानात दोन अंशांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

  नवी दिल्ली, 18 एप्रिल : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वाढत्या तापमानाने जनता हैराण झाली आहे. (Heat Increasing in India) शनिवारी यावर्षी प्रथमच ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. त्याचबरोबर किमान तापमानात दोन अंशांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या कडाक्याच्या उन्हात नागरिकांनी घराबाहेर पडल्याने आजारी पडण्याचा धोकाही वाढला आहे. सततच्या उष्ण वाऱ्यांनंतर दिल्लीत पुन्हा उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

  आयएमडीनुसार, दिवसभरात येथे हवामान स्वच्छ असेल. येत्या 18 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून दोन दिवस उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळणार नाही. काल म्हणजेच 17 एप्रिल 2022 रोजी दिल्लीत किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

  या शहरांमध्ये 40 अंशांपेक्षा जास्त तापमान -

  पश्चिम राजस्थानमध्येही वाढत्या तापमानाने विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. राजस्थानच्या उत्तरेकडील भागात उष्णतेच्या लाटेची स्थिती दिसली. काल रविवारी, चंद्रपूरमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. IMDच्या माहितीनुसार, खजुराहो (मध्य प्रदेश), तर राजस्थानमधील फलोदी आणि बिकानेर येथे 43.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

  हेही वाचा - Live Updates: भुसावळचे तापमान 14 दिवसांनी पुन्हा 44 अंश, शहरात 44.1 अंश तापमानाची नोंद

  ओडिशामधीलही तापमान 40 अंशांपेक्षा जास्त - 
  शनिवारी ओडिशामधील कमीत कमी 15 ठिकाणी तापमान 40 अंशांपेक्षा जास्त राहिले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी 40 अंश तापामानाचा रेकॉर्ड मोडला. इथे शनिवारी सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअस तापमान सुवर्णपूर इथे नोंदवण्यात आले. तर बोलांगीर येथे 43 आणि आंगुल येथे 42.7 अंश सेल्सिअस इतके तापमान राहिले.
  उत्तरप्रदेशातही उन्हामुळे जनता त्रस्त आहे. इथेसुद्धा एप्रिल महिन्यात पारा हा 40च्या पार गेला आहे. शनिवारी,  लखनऊचे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते. तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसाततही इथल्या कडक उन्हापासून दिलासा मिळणार नाही.
  हरियाणामधील परिस्थिती काय?
  हरियाणा राज्यातील अनेक भागात तापामाने उच्चांक गाठला. तर वाढत्या उष्णतेमध्ये काल शेजारील पंजाब राज्यात पारा 40 अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नारनौल आणि गुरुग्राम येथे अनुक्रमे 43.4 आणि 42.6 तापमान नोंदवले गेले. तर तेच अंबाला मध्ये 39.6, भिवानी 40.7 आणि रोहतकमध्ये सर्वाधिक 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाबमध्ये अमृतसरमध्ये पारा हा 39 पर्यंत पोहोचला आहे. तर लुधियाना 39.2, पटियाला 40.6 आणि जालंधरमध्ये 39.2 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: IMD, IMD FORECAST, Rise in temperatures, Weather forecast, Weather update

  पुढील बातम्या