मराठी बातम्या /बातम्या /देश /नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; लवकरच आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू होण्याची शक्यता

नागरिकांसाठी दिलासादायक बातमी; लवकरच आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू होण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होण्यासंदर्भात भारताकडून विविध देशांसोबत चर्चा सुरू आहे

आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होण्यासंदर्भात भारताकडून विविध देशांसोबत चर्चा सुरू आहे

आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होण्यासंदर्भात भारताकडून विविध देशांसोबत चर्चा सुरू आहे

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : सध्या देशातील काही भागातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. असे असले तरी रुग्णसंख्या वाढू नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाण सेवा बंद ठेवण्यात आले आहेत.

मात्र लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. नागरी उड्डाण मंत्री (Civil Aviation Minister) हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी मंगळवारी सांगितले की भारत आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी (International Flights) द्विपक्षीय अस्थायी व्यवस्था (एअर बबल) स्थापित करण्यासाठी ऑस्ट्रेलिया, जपान आणि सिंगापुर सह 13 देशांसोबत चर्चा करीत आहेत. या प्रकारच्या व्यवस्थेमुळे दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांनी काही प्रतिबंधांसह आंतरराष्ट्रीय उड्डाणं संचालित करू शकतात.

अनेक शेजारील देशांना पाठवले प्रस्ताव

पुरी यांनी ट्विट केले आहे की शेजारील देशांना श्रीलंका, बांग्लादेश, अफगनिस्तान, नेपाळ आणि भूतानसह यांच्यासह अशी व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव केले आहे. भारताने जुलैपासून अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स, जर्मनी, यूएई, कतार आणि  मालदीवसह अशा प्रकारचे करार केले आहेत. पुरी यांनी ट्विटर सांगितले की, 'आम्ही आता यापुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही व्यवस्था कायम करण्यासाठी आणखी 13 देशांसोबत बातचीत करीत आहे.

हे वाचा-'देशाचा मृत्यूदर 1.92 टक्के, मुंबईचा मृत्यूदर 5.40 टक्के'; फडणवीस चिंतेत

भारतात 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणं स्थगित

ते पुढे म्हणाले की, या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, न्यूजीलँड, नायजेरिया, इज्राईल, केनिया, फिलिपिन्स, रशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि थायलँड सहभागी आहेत. कोरोना व्हायरसच्या महासाथीमुळे भारतात 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे स्थगित करण्यात आल्या आहेत. पुरी म्हणाले की भारत या देशांव्यतिरिक्त अन्य देशांसोबत अशीच द्विपक्षीय व्यवस्था स्थापिक करण्याचा विचार करेल.

First published:

Tags: Corona virus in india