नवी दिल्ली, 14 जून: अपुऱ्या झोपेमुळे केवळ ताण, तणाव आणि थकावा येत नाही. तर याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर देखील होत असतो. तुम्ही 6 ते 7 तासाची झोप घेत नसाल तर त्यामुळे हृदय विकाराचा धक्का बसण्याची शक्यता वाढते. अशाच प्रकारची एक घटना समोर आली असून 26 वर्षीय तरुणाला हृदय विकाराचा धक्का बसला. ही घटना आहे नवी दिल्लीतील मेहुल सिंग पुरी या तरुणाची...बीपीओमध्ये काम करणाऱ्या मेहुल रात्रभर काम करुन दिवसभरात वेळ मिळेल त्याप्रमाणे झोपत असे. अर्थात ही झोप अनियमीत आणि अपुरी होती होती. त्याच्या जोडीला बाहेरचे जेवण आणि व्यायामाचा अभाव यामुळे मेहुलला हृदय विकाराचा धक्का बसला. एक दिवस रात्री काम करत असताना मेहुलला हृदय विकाराचा धक्का बसला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर आता दोन स्टेंट लावण्यात आले आहेत. केवळ 26व्या वर्षी मेहुल हृदय विकाराचा रुग्ण झाला आहे. मेहुल हे केवळ प्राथिमक उदाहरण आहे.
अपुरी झोप वाढवते तणाव...
युनिव्हसिटी ऑफ साऊथ फ्लोरिडाने 130 कर्मचाऱ्यांचा सर्व्हे केला होता. हे सर्व कर्मचारी रात्री काम करुन दिवसा झोप घेणारे होते. या सर्व कर्मचाऱ्यांची झोप कमी होत असल्यामुळे अनोक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले होते. अपुऱ्या झोपेमुळे तणाव वाढल्याचे सर्व्हेमध्ये म्हटले होते. हृदय विकाराच्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे कमी झोप असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कमीत कमी सहा ते सात तास झोप घेतली पाहिजे. झोपेचे तास कमी झाले तर त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. जेव्हा झोप कमी होते तेव्हा तणाव वाढतो आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
रात्री होणारे जागरण, सिगारेट, जंक फूड यामुळे हृदयावर ताण वाढतो. अनेक वेळा हदयावरील ताण लक्षात देखील येत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बदललेली जीवनशैली यामुळे तरुणांमध्ये मधुमेह आणि रक्तदाब असे आजार दिसून लागले आहेत. या आजारांची पुढील पायरी म्हणजे हृदय विकार होय.
VIDEO : मला 'वंचित' शब्द आवडत नाही, उदयनराजे भडकले