राम मंदिर वादावर पुढची सुनावणी 8 फेब्रुवारीला

राम मंदिर वादावर पुढची सुनावणी 8 फेब्रुवारीला

या गोष्टीला बरोबर 25 वर्षं पूर्ण होत असतानाच सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीस सुरूवात होणार आहे. याप्रकरणी २०१० साली अलाहाबाद हायकोर्टानं निर्णय दिला होता. हायकोर्टानं अयोध्येमधली विवादीत जागा तीन भागांमध्ये विभागली होती

  • Share this:

दिल्ली, 05 डिसेंबर: रामजन्मभूमी प्रश्नावर पुढची सुनावणी 8 फेब्रुवारी 2018ला होणार आहे. सुन्नी वफ्फ बोर्डानं पूर्ण कागदपत्र देण्याची मागणी केल्यानं आता सुनावणी पुढे ढकलली गेलीय.

राम मंदिर वादाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार होती. ज्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार होती, त्यामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचाही समावेश आहे.

1992 साली बाबरी मशीद पाडली गेली होती. या गोष्टीला बरोबर 25 वर्षं पूर्ण होत असतानाच सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणीस सुरूवात होणार आहे. याप्रकरणी   २०१० साली अलाहाबाद हायकोर्टानं निर्णय दिला होता. हायकोर्टानं अयोध्येमधली विवादीत जागा तीन भागांमध्ये विभागली होती.  सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि भगवान राम लल्ला, अशी ही विभागणी होती. हायकोर्टाच्या निकालाविरूद्ध 13 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. राम मंदिराच्या बाजूनं युक्तिवाद मांडण्यासाठी सुप्रसिद्ध आणि वरिष्ठ वकिलांची फळी उभी राहणार आहे. यामध्ये के पराशरन, सी एस वैद्यनाथन आणि सौरभ समशेरी यांचा समावेश आहे. तर सॉलिसीटर जनरल तुषार मेहता उत्तर प्रदेश सरकारची बाजू माडंतील.

बाबरी मशीद  1528 साली  बाबर या मुघल बादशहाने बांधली होती. त्यापूर्वी तिथे रामाचं मंदिर होतं असं हिंदुंचं म्हणणं आहे. ज्या ठिकाणी बाबरी मशीद आहे त्याच ठिकाणी प्रभु श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता अशी हिंदुची मान्यता आहे.त्यामुळे गेले अनेक वर्ष चालू असलेल्या या खटल्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: December 5, 2017, 8:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading