आधार लिंकबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, ममतादीदींनाही बजावलं

आधार लिंकबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस, ममतादीदींनाही बजावलं

संसदेनं संमत केलेल्या कुठल्याही कायद्याच्या विरोधात राज्य सरकार जावू शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने बजावलंय.

  • Share this:

30 आॅक्टोबर : आधार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका दिलाय. पश्चिम बंगाल सरकारनं दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावलीये.

तसंच मोबाईल फोनला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक  करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.

जस्टिस एके सिकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपिठाने चार आठवड्यात केंद्राला उत्तर देण्यास सांगितले आहे.

संसदेनं संमत केलेल्या कुठल्याही कायद्याच्या विरोधात राज्य सरकार जावू शकत नाही असंही सुप्रीम कोर्टाने बजावलंय.

ममता बॅनर्जी यांनी फोन नंबरशी आधार क्रमांक लिंक करायला नकार दिला होता. ममता बॅनर्जी त्याबाबत व्यक्तिगत याचिका करू शकतात असंही कोर्टानं सांगितलंय.

तसंच आधार क्रमांक फोन नंबरशी लिंक करण्याबाबत येणाऱ्या याचिकांची सुनावणी करण्याचं आश्वासनही कोर्टानं दिलंय.

First published: October 30, 2017, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading