आधार सक्तीवर 17 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी

आधार सक्तीवर 17 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी

मोबाईल नंबर आणि बॅंक अकाउंट नंबर आधार लिंकची सक्ती केल्याने वैयक्तिक गोपनीयतेचं उल्लंघन होत आहे का अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

  • Share this:

 दिल्ली  15 डिसेंबर:  आधार संदर्भात सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने अंतरीम निर्णय दिला आहे.  सर्वच  योजनांसाठी  आधार लिंक करण्याची तारीख 31 मार्च 2018 पर्यंत वाढवली असून  आधार सक्तीवर 17 जानेवारीला सुप्रीम कोर्टात निर्णय सुनावण्यात येणार आहे.

विविध योजनांशी आधार कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मुदत वाढवून दिलीये. बँक अकाऊंट,मोबाईल फोन, प्रोव्हिडंट फंड त्यासोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या योजनांसाठी आधारकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. त्यासर्व योजनांसाठी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आलीये. तसंच कुणाला नवीन बँक खातं उघडायचं असेल तर त्यांना आधार कार्ड लिंकीग पासून  सुट देण्यात आली आहे पण  त्यांना आधार कार्डासाठी अर्ज केल्याची माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.  विविध योजनांना आधार लिंक करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सुनावणीच्या दरम्यान कोर्टानं हा निर्णय दिलाय.

तसंच मोबाईल लिंकींगची  6  फेब्रुवारी पासून 31 मार्च पर्यंच डेडलाईन वाढवण्यात आली आहे. मोबाईल नंबर आणि बॅंक अकाउंट नंबर आधार लिंकची सक्ती  केल्याने वैयक्तिक गोपनीयतेचं उल्लंघन होत आहे का अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावर आता सुप्रीम कोर्टात 17 जानेवारीपासून नियमीत सुनावणी होणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading