मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक, दोन महिन्यानंतर सर्वांत कमी रुग्णसंख्येची नोंद

कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक, दोन महिन्यानंतर सर्वांत कमी रुग्णसंख्येची नोंद

Coronavirus in India:आज देशातल्या कोरोना (New Corona Case)संदर्भात एक दिलादायक बातमी समोर आली आहे.

Coronavirus in India:आज देशातल्या कोरोना (New Corona Case)संदर्भात एक दिलादायक बातमी समोर आली आहे.

Coronavirus in India:आज देशातल्या कोरोना (New Corona Case)संदर्भात एक दिलादायक बातमी समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare
नवी दिल्ली, 06 जून: सध्या भारत देश कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारसह स्थानिक पातळीवर वेगानं प्रयत्न सुरु आहेत. मात्र दुसरीकडे आज देशातल्या कोरोना (New Corona Case) संदर्भात एक दिलादायक बातमी समोर आली आहे. देशात गेल्या दोन महिन्यानंतर सर्वांत कमी रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 93. 67 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे. (Coronavirus in India Latest Updates Today 6 June 2021) केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry of India) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1.14 लाख नव्या रुग्णांची भर पडली. त्यापैकी 2600 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 1.20 नवे रुग्ण आढळून आले होते. तेव्हा 3380 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात सद्यस्थितीत कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 लाखांहून कमी आहे. हेही वाचा- मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, उकाड्यापासून थोडा दिलासा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेली आकडेवारी रविवार ( 06 जून 2021), सकाळी 8 वाजता जारी केलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी गेल्या 24 तासात एकूण नवीन प्रकरणे- 1,14,460 गेल्या 24 तासात पूर्णपणे बरे झालेले रुग्ण- 1,89,232 गेल्या 24 तासात एकूण मृत्यू - 2677 देशात संक्रमित कोरोनाची एकूण संख्या - 2,88,09,339 देशात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या - 2,69,84,781 देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या - 3,46,759 भारतात सध्या कोरोनाची एकूण अॅक्टिव्ह प्रकरणे - 14,77,799 एकूण लसीकरण - 23,13,22,417 या 5 राज्यांमध्ये सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण तमिळनाडू- 21,410 केरळ- 17,328 कर्नाटक- 13,800 महाराष्ट्र- 13,659 आंध्र प्रदेश- 10,373
First published:

Tags: Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या