मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘मी कोरोना पॉझिटिव्ह नाही’ सांगूनही त्याला जबरदस्तीने केलं कोविड रुग्णालयात भरती आणि...

‘मी कोरोना पॉझिटिव्ह नाही’ सांगूनही त्याला जबरदस्तीने केलं कोविड रुग्णालयात भरती आणि...

ब्रिटन आणि अमेरिकेत केलेल्या संशोधनात डॉक्टरांना लक्षणांची 6 क्लस्टर्स सापडली आहेत. त्यात कोरोनाची सर्व लक्षणे आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

ब्रिटन आणि अमेरिकेत केलेल्या संशोधनात डॉक्टरांना लक्षणांची 6 क्लस्टर्स सापडली आहेत. त्यात कोरोनाची सर्व लक्षणे आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

त्या व्यक्तीच्या घरी रुग्णवाहिका आली व त्याला जबरदस्तीने कोविडच्या रुग्णालयात घेऊन गेली.

    अहमदाबाद, 14 मे : देशभरात कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढत असून चाचणीही करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच एक विचित्र बातमी समोर आली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे विविध भागात स्वतंत्र कोविडची रुग्णालये उभारण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना तेथेच भरती केलं जात आहे. मात्र रुग्ण प्रशासनाकडून झालेल्या चुकीमुळे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही दाखल व्हावं लागलं आहे. अहमदाबादमध्ये एका व्यक्तीला तो कोरोनाबाधित नसतानाही जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, इतकचं नाही तर दिवसभर त्याला कोविडच्या रुग्णालयात राहावं लागलं. या व्यक्तीने दावा केला आहे की त्याचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला असतानाही त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं आणि तर सायंकाळी चूक लक्षात येताच त्याला घरी पाठविण्यात आलं. काय आहे संपूर्ण प्रकरण या व्यक्तीला कोरोनाचा संशय होता, त्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी करवून घेतली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र त्याला रुग्णालयातून तुमची टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचा फोन आला. इतकचं नाही तर थोड्या वेळात एक रुग्णवाहिका त्याच्या घरासमोर येऊन थांबली आणि त्याने तातडीने रुग्णालयात भरती व्हावे यासाठी जबरदस्ती करू लागले. शेवटी या व्यक्तीला त्यांच्यासोबत रुग्णालयात जावे लागले. कोविड रुग्णालयात पूर्ण दिवस राहिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पुन्हा चाचणी करण्याची सूचना दिली. रिपोर्टमध्ये ते निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. गुजरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 9267 पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत 537 जणांचा मृत्यू झाला आहे. संबंधित -श्रमिक ट्रेनमध्ये सापडले 3 कोरोना संशयित, बुधवारी 4 प्रवाशांना केलं होतं आयसोलेट धक्कादायक! कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या भाजप युवा मोर्चा नेत्याचा मृत्यू
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Gujrat

    पुढील बातम्या