नाका, तोंडात Fevikwik टाकून त्यानं पत्नीचा जीव घेतला

नाका, तोंडात Fevikwik टाकून त्यानं पत्नीचा जीव घेतला

मध्यप्रदेशातील विदिशा येथील 40 वर्षीय एक व्यक्तिने त्याच्या पत्नीच्या नाका-तोंडात आणि डोळ्यात फेवीक्विक (Fevikwik) टाकून जीवे मारले.

  • Share this:

विदिशा (मप्र), 5 ऑगस्ट :  मध्यप्रदेशतील विदिशात एका 40 वर्षीय व्यक्तिने त्याच्या पत्नीच्या नाका, तोंडात आणि डोळ्यात फेवीक्विक (Fevikwik) टाकून तीच जीव घेतला. यात जीव गुदमरल्याने तीचा मृत्यू झाला. कोतवाली पुलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक आर.एन. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनूसार, राजपूत कॉलनीत राहणाऱ्या हल्केराम कुशवाह (वय 40) याने त्याची पत्नी दुर्गाबाई हिच्या नाक-तोंडात आणि डोळ्यात फेवीक्वीक टाकले. जीव गुदमरल्या मुळे दुर्गाबाईचा मृत्यू झाला.

आरोपी ने पहिले त्याच्या दोन्ही मुलांना घराबाहेर पाठले आणि त्यानंतर हे क्रूर कृत्य केले. ही घटना घटना तेव्हा समोर आली, जेव्हा आरोपीचा लहान मुला शाम घरी पतला आणि त्याने आपल्या आईला मृतावस्थेत पाहीले. 15 वर्षाच्या शामने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्केरामवर पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून, पोलीस त्याचा तपास करीत आहेत.

मुलांनी पुलिसांना सांगितले की, त्यांचा बाप दारू ढोसून नेहमी त्यांच्या आईसोबत भांडायचा. यापूर्वीसुद्धा त्यानं आईला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी मे 2016 मध्ये रीवा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. त्यात रात्री दारू पिऊन घरी परतलेल्या संतोष विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या पत्नीने अशाच पद्धतीने फेवीक्वीक टाकून जीवे मारले होते.

हेही वाचा..

मराठा आरक्षणावर काय बोलले मुख्यमंत्री? वाचा 20 ठळक मुद्दे

VIDEO: मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांची गाडी फोडली

खडसेंना पंतप्रधानही व्हावंसं वाटेल,गिरीश महाजनांचा टोला

First published: August 5, 2018, 9:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading