मराठी बातम्या /बातम्या /देश /

तो लढला आणि जिंकलाही! गोव्याला कोरोनामुक्त करणारा पडद्यामागचा हीरो

तो लढला आणि जिंकलाही! गोव्याला कोरोनामुक्त करणारा पडद्यामागचा हीरो

गोवा या राज्यात पहिला रुग्ण सापडताच सर्व सीमा सील केल्या होत्या

गोवा या राज्यात पहिला रुग्ण सापडताच सर्व सीमा सील केल्या होत्या

गोवा या राज्यात पहिला रुग्ण सापडताच सर्व सीमा सील केल्या होत्या

  • Published by:  Meenal Gangurde
पणजी, 26 एप्रिल : 23 एप्रिल हा दिवस अवघड होता. येथे कोविड - 19 चा पुढचा हल्ल्या होण्यापूर्वीच 300 खाटांची तयारी केली जात होती. कारण इतर ठिकाणी अडकलेले खलाशी परतत होते. अशा परिस्थितीत टेस्टिंग किट्स राज्यातील बंदरे आणि बोर्डर्सवर तयार ठेवण्यात आले होते. यासह नवीन मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, गोव्यातील ईएसआयएस रुग्णालयाच्या कोविड सुविधा येथील कक्षात डॉ. एडविन गोम्स यांना भेटण्यासाठी एक व्यक्ती आला. गोम्स सांगतात की, कोरोनाग्रस्त आढळलेल्या पहिल्या काही रूग्णांपैकी एडगर ज्युलियन रेमेडोस तेथे आले होते. केवळ डॉक्टरांना मिठी मारण्यासाठी ते रुग्णालयात परत आले होते. ही बाब लहान असली तरी आपला प्राण वाचविण्याऱ्या डॉक्टरांप्रती आस्था व्यक्त करणारी आहे. गोवा हे लहान राज्य असले तरी तेथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे येथे लागण पसरण्याची शक्यता अधिक होती. मात्र वेळीच उपयायोजना केल्याने गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू दिला नाही. यामध्ये डॉ. एडविन गोम्स यांचा मोठा वाटा आहे. राज्यात घडलेल्या घटनांकडे त्यांचं लक्ष होतं. 25 मार्च रोजी मुंबईत एका महिन्यापासून अडकलेल्या तब्बल 100 मच्छिमारांना बसने गोव्यात परत आणण्यात आले. त्याच आठवड्यात गोवा सरकारने 22 मार्च रोजी सीमा बंद केल्या होत्या. मुंबईत राहणारे गोव्यातील तब्बल 100 खलाशी 25 मार्च रोजी परत गोव्यात आणण्यात आले. ते लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडले होते.  गोव्यात कोरोना विषाणूची लागण होण्याची एकूण 7 रुग्ण, सर्व बरे झाले आहेत. गोव्यात कोरोनाव्हायरस संसर्गाची एकूण 7 प्रकरणं नोंदवली गेली आहेत आणि सध्या संसर्गाचे कोणतेही सक्रिय प्रकरण नाही. जेव्हा राज्यातील पहिल्या रुग्णाला 18 मार्च रोजी रुग्णालयात दाखल केले गेले होते, तेव्हापासून 19 एप्रिलपर्यंत 33 दिवसांत 7 व्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला होता. संबंधित -धक्कादायक! अख्खं पोलीस ठाणे झालं क्वारंटाइन, संशयित बेपत्ता झाल्याने धावाधाव
First published:

Tags: Corona virus in india, Goa

पुढील बातम्या