मराठी बातम्या /बातम्या /देश /

पदवीधर तरुणा्ंसाठी मोठी बातमी! TCS नंतर ही कंपनी देणार 15 हजार जणांना नोकरी

पदवीधर तरुणा्ंसाठी मोठी बातमी! TCS नंतर ही कंपनी देणार 15 हजार जणांना नोकरी

गेल्यावर्षी एचसीएलने 9000 नवीन लोकांना नोकरी दिली होती. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 6 हजार अधिक लोकांना नोकरी देण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी एचसीएलने 9000 नवीन लोकांना नोकरी दिली होती. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 6 हजार अधिक लोकांना नोकरी देण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी एचसीएलने 9000 नवीन लोकांना नोकरी दिली होती. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 6 हजार अधिक लोकांना नोकरी देण्यात येणार आहे.

    नवी दिल्ली, 23 जुलै : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात (Coronavirus) ज्यावेळी अधिकतर कंपन्या पगारकपात आणि नोकरकपात करत आहेत. त्याचवेळी देशातील मोठी आयटी कंपनी असणारी एचसीएल टेक्नॉलॉजी (HCL Technologies)ने तरुणांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. चालू आर्थिक वर्षात 15 हजार लोकांचे कँपस हायरिंग होणार आहे. गेल्यावर्षी एचसीएलने 9000 नवीन लोकांना नोकरी दिली होती. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी 6 हजार अधिक लोकांना नोकरी देण्यात येणार आहे. याआधी देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने 44 हजार पदवीधन फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली होती. एवढा असणार पगार टाइ्म्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार एचसीएल टेकचे एचआर हेड व्हीव्ही अप्पाराव यांनी अशी माहिती दिली आहे की, कोरोना व्हायरसमुळे कँपस प्लेसमेंट प्रभावित झाले आहेत. यामुळे विविध संस्थाच्या कामकाजामध्ये बाधा निर्माण झाली आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, या फ्रेशर्ससाठी पगार वार्षिक सरासरी 3.5 लाख रुपये असेल. त्यांनी अशी माहिती दिली की कंपनीची भरती प्रक्रिया व्हर्च्यूअल मोडमध्ये स्थानांतरित झाली आहे. साधारणपणे एचसीएल टेक प्रत्येक तिमाहीला 3500-4000 लोकांना नोकरीची संधी देते. मात्र आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहमध्ये केवळ 2000 लोकांना नोकरीवर घेण्यात आले आहे. 9 वी आणि 11 वी नापास विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी, राज्य सरकारचा नवा निर्णय जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीचा फायदा 32 टक्क्यांनी वाढला कोराना व्हायरस पँडेमिकमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आणि जवळपास 96 टक्के कर्मचारी घरून काम करत असून देखील कंपनीने जूनच्या तिमाहीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीचा फायदा 31.70 टक्क्यांनी वाढून 2,925 कोटी राहिला आहे. गेल्यावर्षीच्या जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीचा फायदा 2,220 कोटी होता. अनलॉकनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती प्रत्येक पालकासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र सायबरनं केलं आवाहन दरम्यान एचसीएल टेकमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजीजचे चेअरमन शिव नाडर (Shiv Nadar) यांनी त्यांचे पद सोडले आहे. त्यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा लगेचच कंपनीच्या नव्या चेअरमन बनल्या आहेत. शिव नाडर कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर कायम राहतील. त्यांचे पद चीफ स्ट्रॅटजी ऑफिसरचे असेल.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या