Home /News /national /

...आणि एका क्षणात पुरात वाहून गेला तरुण, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

...आणि एका क्षणात पुरात वाहून गेला तरुण, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

हैदराबादसह संपूर्ण तेलंगणाला तुफान वादळी पावसाचा फटका बसला. सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने NDRF च्या टीमना पाचारण करण्यात आलं.

    हैदराबाद, 14 ऑक्टोबर : हैदराबादमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. दोन दिवसांपासून अनेक भागांमध्ये तुफान पाणी साचलं आहे तर रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे आणि त्यामुळे अनेक घरं पाण्याखाली गेली तर गाड्याही वाहून गेल्या आहेत. याच दरम्यान एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता तरुण वाहून जात आहे. हा तरुण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहे आणि त्याला रेस्क्यू करण्यासाठी टीमचे प्रयत्न सुरू असतानाचा पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो आणि हा तरुण पाण्यासोबत वाहून जात असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की पाण्याचा प्रवाह किती जास्त आहे याचा अंदाज या व्हिडीओमधून येऊ शकतो. या तरुणाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हे वाचा-मुंबई बत्ती गूल प्रकरणी धक्कादायक माहिती, सायबर हल्ल्याची होती शक्यता हैदराबादसह संपूर्ण तेलंगणाला तुफान वादळी पावसाचा फटका बसला. सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने NDRF च्या टीमना पाचारण करण्यात आलं.तेलंगणात झालेल्या पावसाच्या थैमानानंतर बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर बुधवार आणि गुरुवारी दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणा राजधानी हैदराबाद येथे मंगळवारी उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. हैदराबादच्या बदलागुडा भागात मुसळधार पावसामुळे एक बोल्डर घरात पडला. यामुळे एका मुलासह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य 3 लोक जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्यामुळे हैदराबाद, तेलंगणा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या