भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यस्थीचे संकेत

भारत आणि पाकिस्तानमधला तणाव कमी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यस्थीचे संकेत

'दोघांमध्ये सध्या तणाव आहे आणि आम्ही मध्यस्थी करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तणाव लवकरच निवळेल अशी मला आशा आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 28 फेब्रुवारी :   भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव आहे. हा तणाव कमी व्हावा यासाठी पडद्याच्या मागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे संकेत दिले आहेत. दोन्ही देशांमधला तणाव लवकरच कमी होईल आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प म्हणाले, ''अमेरिकेकडे बऱ्यापैकी चांगली बातमी आहे. दोघांमध्ये सध्या तणाव आहे आणि आम्ही मध्यस्थी करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय. तणाव लवकरच निवळेल अशी मला आशा आहे.  हा तणाव दशकानुदशकं सुरू आहे. दुर्दैवानं दोघांना एकमेकांविषयी प्रचंड तिरस्कार आहे. म्हणून आम्ही दोघांना मदत करण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न करतोय. जेणेकरून शांतता नांदेल, आणि मला आशा आहे तणाव लवकरच निवळेल.''

अमेरिकेचं भारताला समर्थन

भारत- पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक पॉम्पियोशी चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोवाल यांनी पॉम्पियोशी मध्यरात्री फोनवर चर्चा केली. यानंतर डोवाल म्हणाले की, भारताने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेला हल्ला योग्य असल्याचं अमेरिकेचं मत आहे. अमेरिकेकडून मिळालेल्या या समर्थनादरम्यान आज गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सीमेवर चाललेल्या हालचालींवर चर्चा करण्यात आली.

SPECIAL REPORT : पाकिस्तान करू शकतो अण्वस्त्रांचा वापर?

First published: February 28, 2019, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading