बोर्डाच्या परीक्षांची भीती वाटतेय? तर आज पंतप्रधानांना विचारा प्रश्न!

बोर्डाच्या परीक्षांची भीती वाटतेय? तर आज पंतप्रधानांना विचारा प्रश्न!

तोंडावर आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भात ते आज विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बोलणार आहेत.

  • Share this:

16 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. तोंडावर आलेल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भात ते आज विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे बोलणार आहेत. यात लाखोंच्या संख्येनं विद्यार्थ्यांचा सहभार असणार आहे. यातून पंतप्रधान विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देणार आहेत. या कार्यक्रमाला दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये आज 12 वाजता सुरूवात होणार आहे.

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी? त्याचबरोबर परीक्षेदरम्यान ताणतणावात अभ्यास करू नये. अशा अनेक विषयांवर नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. म्हणूनच 'परीक्षा पे चर्चा' असं का कार्यक्रमाचं नाव ठेवण्यात आलं आहे.

अनेक शाळा, कॉलेजांमध्ये मोदींचा हा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. सीबीएससीच्या विद्यार्थ्यांनाही मोदी आज मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमातून तब्बल 10 विद्यार्थ्यांना थेट नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर 'mygovapp' या अॅपद्वारे आलेल्या प्रश्नांनाही मोदी उत्तर देणार आहेत.

या कार्यक्रमासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी ट्विटदेखील केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, 'आज विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी परीक्षेसंदर्भात बोलण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आज दुपारी 12 वाजता 'परीक्षा पे चर्चा'मधून मी तुमचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे.'

त्यामुळे तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तुम्हीही या कार्यक्रमात भाग घेऊ शकता.

First published: February 16, 2018, 9:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading