राज्यसभेचा राजीनामा देण्याची मायावतींची घोषणा

राज्यसभेचा राजीनामा देण्याची मायावतींची घोषणा

दलितांवर होणारे अत्याचाराचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करताना आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असा दावा मायावतींनी केलाय.

  • Share this:

18 जुलै : बसपाच्या अध्यक्ष मायावतींनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलंय. दलितांवर होणारे अत्याचाराचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करताना आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असा दावा मायावतींनी केलाय.

संसदेत बोलण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ दिला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. रागारागात त्यांनी सभात्याग केला.

भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यावेळी मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. मला सभागृहात बोलू दिलं नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन असा इशारा मायावतींनी दिला. त्यानंतरही भाजपनं माफीची मागणी लावून धरली. त्यामुळे त्या सभागृहाबाहेर पडल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 12:59 PM IST

ताज्या बातम्या