• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • FACT CHECK: वर्क फ्रॉम होमविषयी केंद्र सरकारनं 'हा' मोठा निर्णय घेतलाय? व्हायरल मेसेजबाबत जाणून घ्या सत्य

FACT CHECK: वर्क फ्रॉम होमविषयी केंद्र सरकारनं 'हा' मोठा निर्णय घेतलाय? व्हायरल मेसेजबाबत जाणून घ्या सत्य

कामाच्या दबावामुळे मुलांबरोबरच्या नात्यात अंतर निर्माण झालं आहे.

कामाच्या दबावामुळे मुलांबरोबरच्या नात्यात अंतर निर्माण झालं आहे.

सरकारने वर्क फ्रॉम होमविषयी काही घोषणा केल्याचे मेसेज व्हायरल (Viral) होत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे (Corona) लॉकडाउन (Lockdown) किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ही स्थिती असून, यामुळे अनेक क्षेत्रांवर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. कोरोनामुळे नोकरी किंवा रोजगार अडचणीत आले असून, अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी पगारकपातही लागू केली आहे. तसेच अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होमला (Work From Home) प्राधान्य देत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय अजूनही म्हणजेच एक ते दिड वर्षांनंतरही अवलंबला जात आहे. कोरोनाच्या स्थिती अस्पष्ट असल्याने अजूनही काही काळ वर्क फ्रॉम होम सुरुच राहण्याची शक्यता आहे. त्यातच काही मोठ्या कंपन्यांनी ही सिस्टीम दिर्घकाळ सुरु राहणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने वर्क फ्रॉम होमविषयी काही घोषणा केल्याचे मेसेज व्हायरल (Viral) होत असून, त्यातील दावे चुकीचे असल्याचे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जाणून घेऊया या प्रकाराविषयी सविस्तर... सध्या वर्क फ्रॉम होमच्या अनुषंगाने सध्या व्हॉट्सॲपवर (Whatsapp) अनेक मेसेज (Message) व्हायरल होत आहेत. सरकार एका संस्थेच्या मदतीने घरुन काम करण्याची संधी देत असल्याचे, या मेसेजमध्ये म्हटलं आहे. मात्र, हा मेसेज खोटा असल्याचं स्पष्ट करत, अशी कोणतीही योजना नसल्याचे केंद्र सरकारने (Central Government) सांगितले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB) फॅक्ट चेक (Fact Check) तपासणी युनिटने व्टिट करत, सरकारकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आली नसून, फसवणूक करणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला संबंधित कर्मचाऱ्यांना दिला. हे वाचा -कोरोनानंतर पुन्हा वाढताहेत जॉबच्या संधी आणि पगार; 'हे' टॉप क्षेत्रं जोमात कोरोनामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. जवळपास एका वर्षानंतरही अनेक कार्यालये आपल्या कर्मचाऱ्यांकडून घरुनच कामे करुन घेत आहेत. अशा स्थितीत फसवणुकीच्या उद्देशानं पाठवलेले मेसेजही काही जणांना खरे वाटू शकतात. पीआयबीने फॅक्ट चेक करत, वर्क फ्रॉम होमच्या अनुषंगाने असलेला हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या कोणत्याही लिंकवर (Link) लोकांनी क्लिक करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सरकारकडून करण्यात येणाऱ्या कोणत्याही घोषणा या संबंधित मंत्रालय किंवा विभागांच्या अधिकृत वेबसाईटवर करण्यात येतात. नोकरीशी संबंधित घोषणा संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाइटव्दारे किंवा संस्थेच्या व्हेरिफाइड सोशल मीडिया अकाउंटसच्या माध्यमातून केल्या जातात.
  First published: