कुटुंबियांना दूर ठेवत जबरदस्ती केले पीडितेवर अंत्यसंस्कार हाथरस प्रकरणात यूपी पोलिसांवर अनेक आरोप केले जात आहे. रात्री उशिरा पीडितेचा मृतदेह तिच्या गावी पोहोचला. मात्र यावेळी पोलिसांनी कुटुंबियांशिवाय जबरदस्तीने पीडितेवर अंतिम संस्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह घरी नेण्याची परवानगीही दिली नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. पीडितेच्या अंत्यसंस्काराचे अनेक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले गेले आहेत, यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी लोकं रस्त्यावर उतरून पीडितेच्या न्यायाची मागणी करत आहेत.Culprits of #Hathras gangrape incident will not be spared. An SIT has been formed to investigate the incident, the team will submit a report within next 7 days. To ensure swift justice, this case will be tried in a fast-track court: Uttar Pradesh CM Yogi Adityanath (File photo) pic.twitter.com/Lr9G9oIQaV
— ANI UP (@ANINewsUP) September 30, 2020
'शव जास्त काळ ठेवू शकत नाही' सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओंपैकी एकात पोलीस अधिकारी पीडितेच्या कुटूंबाला असा सल्लाही देत आहेत की, "जास्त काळ मृतदेह ठेवणे योग्य नाही. प्रत्येक गोष्ट प्रथेनुसार असावी". एका व्हिडीओमध्ये पीडित तरुणीची आई पोलिसांनी विनवण्या करताना दिसत आहेत. यात त्या, "माझ्या मुलीला एकदा घरी घेऊन जाऊ दे. अंत्यसंस्कार करण्याची एवढी घाई का? आता रात्र झाली आहे...घाई कशाला करत आहात? याला उत्तर देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, 'मी राजस्थानचा आहे. प्रथेनुसार मृतदेह जास्त काळ ठेवला जात नाही". पोलिसांनी केलेल्या या अरेरावीनंतर सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात आहे.Members of the community of #Hathras gang-rape victim, protest in the city demanding justice for her. The protesters also raised slogans against Police and local administration. pic.twitter.com/b3lIz9saMo
— ANI UP (@ANINewsUP) September 30, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Up crime news, Yogi Aadityanath