लखनऊ 13 ऑक्टोबर: सर्व देशभर चर्चेत असलेल्या हाथरस प्रकरणाची सध्या(Hathras Case) सीबीआय (CBI) चौकशी करत आहे. चौकशीला आता वेग असतानाच पीडित मुलीच्या वडिलांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर आता आईची सुद्ध तब्येत बिघडली आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Mother of Hathras Incident's victim taken to hospital.) काळजीचं कारण नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पीडित मुलीचे पालक हे सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात हजर झाले होते. सुरुवातीला वडिलांची प्रकृती बिघडली होती. मात्र त्यांनी दवाखान्यात जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी हे स्वत: पीडित कुटुंबीयांच्या घरी आले आणि त्यांनी तपासणी केली.
वडिलांचा रक्तदाब वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं. तर रुग्णवाहिका बोलावून आईला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा ताण त्यांच्यावर असून त्या ताणामुळेच प्रकृती बिघडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, सीबीआयचं पथक हाथरस जवळच्या त्या खेड्यात दाखल झालं असून घटनेचा तपास करण्यात येत आहे. पीडित कुटुंबीयांना पोलिसांचं पूर्ण संरक्षण देण्यात आलं आहे.
Mother of #HathrasIncident's victim taken to hospital. She is being accompanied by two of her family members. Hathras Chief Medical Officer visited the victim's residence after the victim's father who is also not well declined to go to hospital. https://t.co/dGQT4mwNjn pic.twitter.com/mUjoacpp4P
— ANI UP (@ANINewsUP) October 13, 2020
हाथरस प्रकरणावर देशभर चर्चा झाली होती. उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड आरोप झाले होते. देशभर वातावरण तापल्यानंतर राज्य सरकारने प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने त्याबाबतचा आदेश काढून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी कुटुंबीयांची परवानगी न घेताच पीडित मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे देशभर असंतोष निर्माण झाला होता. राज्य सरकारने स्थानिक अधिकाऱ्यांचं निलंबनही केलं होतं. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला नव्हता तर स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतला होता असं राज्य सरकारने कोर्टात सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar paredesh, Uttar pradesh news