पाटणा, 27 मे : बिहारमधल्या बेगुसरायमध्ये एका मुस्लीम तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. हा हल्ला करणाऱ्याचं नाव राजीव यादव असं आहे. हल्ला झालेल्या मुस्लीम तरुणाने आपल्यावरच्या हल्ल्याबद्दल एका व्हिडिओमध्ये सांगितलं.हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मोहम्मद कासिम या तरुणाला हल्लेखोर राजीव यादवने त्याचं नाव विचारलं. या तरुणाने नाव सांगितल्यावर, मग तू पाकिस्तानला जा, अशा शब्दात हल्लेखोर त्याच्यावर ओरडला आणि त्याने त्याच्या दिशेने गोळी मारली.
ज्या हल्लेखोरावर हा हल्ला केल्याचा आरोप आहे त्याला पोलिसांनी अजून अटक केलेली नाही. पण या आरोपीचा शोध सुरू आहे, असं एस. पी. अवकाश कुमार यांनी सांगितलं.
ओवेसींची टीका
MIM चे नेते असादुद्दीन ओवेसी यांनी या घटनांवरून भाजप नेतृत्वाला लक्ष केलं आहे. भाजपच्या नेत्यांनी आम्हाला पाकिस्तानशी जोडून आमचं नेहमीच खच्चीकरण केलं आहे, असं असादुद्दीन ओवेसी म्हणाले.
Qasim almost lost his life for literally just saying his name. But sure, I am ‘fear mongering’
Where does Rajiv’s brazenness come from? From the top. BJP’s leadership has constantly demonised us & associated us with Pakistan
We’re not human in their eyes, we’re target practice https://t.co/KLY3e1MAAJ
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 27, 2019
'कुणीही मदतीला आलं नाही'
राजीव यादव हा हल्लेखोर माझ्यावर आणखीही गोळ्या झाडणार होता पण तो तिथून पळून गेला, असं मोहम्मद कासिम याने सांगितलं. हा हल्ला होत असताना माझ्या कुणी मदतीलाही आलं नाही. यादव हवेमध्ये बंदूक फिरवत होता त्यामुळे बरेच जण घाबरलेले होते, असंही तो म्हणाला.
सरपंचांकडे मागितली दाद
ही घटना घडल्यावर मोहम्मद कासिमने सरपंचांकडे जाऊन दाद मागितली पण तिथेही त्याला कुणी मदत केली नाही. मोहम्मद कासिमने त्या स्थितीत पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला उपचारांसाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
याआधी असे 2 हल्ले
देशभरात द्वेषभावनेतून हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे. याआधी मध्य प्रदेशमध्ये गोमांस खाण्याच्या आरोपावरून तीन मुस्लीम तरुणांवर हल्ला झाला होता तर गुरगावमध्येही एका मुस्लीम तरुणावर हल्ला करून त्याला जय श्रीराम म्हणण्यासाठी भाग पाडण्यात आलं.
==============================================================================
VIDEO: MIMचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील का भडकले?