मराठी बातम्या /बातम्या /देश /

'इटलीहून परतलेल्या राहुल गांधींनी कोरोनाची चाचणी केली का?'

'इटलीहून परतलेल्या राहुल गांधींनी कोरोनाची चाचणी केली का?'

भाजपच्या खासदारांनी संसदेजवळ पत्रकारांशी बोलताना असं खोचक वक्तव्य केलं आहे

भाजपच्या खासदारांनी संसदेजवळ पत्रकारांशी बोलताना असं खोचक वक्तव्य केलं आहे

भाजपच्या खासदारांनी संसदेजवळ पत्रकारांशी बोलताना असं खोचक वक्तव्य केलं आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 5 मार्च : इटलीहून भारतात परतलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोनाची चाचणी केली का? असा खोचक सवाल भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला. यावरुन बिधुरी यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधत हा प्रश्न उपस्थित केला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतात आल्यानंतर सर्वात आधी आपली तपासणी करुन घ्यायला हवी होती, असंही ते यावेळी म्हणाले.

जगभरात कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. अशा परिस्थितीत इटलीमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून आतापर्य़ंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. संसदेजवळ प्रसारमाध्यमांशी बोलताना बिधुरी म्हणाले, “राहुल गांधी नुकतेच इटलीवरुन परत आले आहेत. त्यांची विमानतळावर तपासणी झाली का? याबद्दल मला माहित नाही. मात्र सध्या जगात कोरोनाचं संकट आहे आणि हा संसर्गजन्य रोग आहे. त्यात ते दिल्लीचा दौरा केला. त्यामुळे लोकांमध्ये जाण्याआधी त्यांनी कोरोना व्हायरसची चाचणी केली की नाही हे सांगायला हवं. लोकांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे”.

राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील हिंसाचाराचा दौरा केला यावेळी आंदोलनी जाळलेल्या एका शाळेपाशी ते येऊन थांबले आणि म्हणाले, ''शाळा हे भारताचं भविष्य आहे. मात्र द्वेष आणि हिंसेने तिला संपवलं जात आहे. यामध्ये कोणाचाच फायदा झालेला नाही.  हिंसा आणि द्वेष विकासाच्या आड येत आहेत. याचा भारताला काही फायदा तर होणार नाहीच उलटपक्षी विभागणीच केली जात आहे. अशा परिस्थितीत भारतातील प्रत्येकाने मिळून प्रेमाने एकत्र काम केलं पाहिजे”.

First published:

Tags: BJP, MP, Rahul gandhi