Home /News /national /

निवृत्त कॅप्टनचा मृतदेह पाच दिवस घरात सडत होता, मुलगा म्हणाला ‘बाबा झोपले आहेत’!

निवृत्त कॅप्टनचा मृतदेह पाच दिवस घरात सडत होता, मुलगा म्हणाला ‘बाबा झोपले आहेत’!

घरात पाच दिवसांपासून वृद्ध वडिलांचा मृतदेह पडून होता. मुलाला त्याचा पत्ताच नव्हता. मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला त्यांची पोलिसांकडं तक्रार केली.

    यमुनानगर, (हरयणा) 15 जानेवारी :  घरात पाच दिवसांपासून वृद्ध वडिलांचा मृतदेह पडून होता. मुलाला त्याचा पत्ताच नव्हता. मृतदेहाच्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला त्यांची पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस घरामध्ये आल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र मुलाला  वडिलांचा मृत्यू झाल्याची कल्पनाच नव्हती. आता पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरु केला आहे. हरयणातील (Haryana) यमुनानगरमधील ही धक्कादायक घटना आहे. यमुनानगर  सेक्टर 17 मध्ये भारतीय लष्करातील (Indian Army) कॅप्टन रँकचे निवृत्त अधिकारी राम सिंह त्यांचा मुलगा प्रवीण कुमार सोबत राहत होते. राम सिंह यांच्या पत्नीचा आणि मुलीचा यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा मानसिक अस्वस्थ असल्याची माहिती आहे. कशी माहिती झाली उघड? राम सिंह यांच्या घरातून मृतदेहाची दुर्गंधी येत होती. त्याचबरोबर प्रवीण गुरुवारी गच्चीवर काही कपडे एकत्र करुन आग लागवत होता. तो सर्व प्रकार त्याच्या शेजारी रहाणाऱ्या एका महिलेनं बघितला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. प्रवीणची मानसिक अवस्था ठीक नसल्यानं त्यानं जाळपोळीचे प्रकार यापूर्वी देखील केली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला कपड्यांची जाळपोळ करण्यापासून रोखलं. त्यानंतर त्यांनी घरातील दुर्गंधीचा शोध घेतला त्यावेळी एका रजईच्या आत वृद्ध राम सिंह यांचा मृतदेह सापडला. ‘बाबा झोपले आहेत’ या सर्व प्रकारावर ‘बाबा सध्या झोपले आहेत, ते थोड्या वेळानं जेवायला उठतील’ अशी प्रतिक्रिया प्रवीणनं दिली. त्याची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर सर्वजण सुन्न झाले. मृत कॅप्टन राम सिंह यांच्या परिवाराचा अन्य व्यक्तींशी फारसा संबंध नव्हता. त्यामुळे त्यांच्या अन्य नातेवाईकांबद्दल माहिती नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. राम सिंह यांचा मृत्यू थंडीमुळे झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या