थोडक्यात जीव वाचला! चाउमीनमुळे चिमुरड्याची फुफ्फुसे फाटली

तुम्हालादेखील चायनीज पदार्थ खाण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 09:39 PM IST

थोडक्यात जीव वाचला! चाउमीनमुळे चिमुरड्याची फुफ्फुसे फाटली

चंदिगड, 24 जून : चाउमीन आणि त्यासोबत सॉस खाल्ल्यानं साडेतीन वर्षांच्या एका मुलाची प्रकृती गंभीर झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या मुलानं चाउमीनसह जास्त प्रमाणात सॉस खाल्ल्यानं त्याच्या फुफ्फुसांना गंभीर इजा होऊन ती चक्क फाटल्याची माहिती समोर आली आहे. हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीनं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या मुलाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्टा केली. जवळपास 23 दिवस त्याच्यावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला आहे.

दरम्यान, आपल्या मुलाला नेमकं काय झालंय, याबाबतचे ठोस कारण त्याच्या कुटुंबीयांना काही दिवस समजलेच नव्हतं. अखेर यमुनानगरमधील गाबा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी पोहोचल्यानंतर खरं कारण समोर आल्यानंतर मुलाच्या पालकांना जबर धक्का बसला. मुलाची फुफ्फुसे फाटली आहेत, असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.

(पाहा:VIDEO : भाजप कार्यकर्त्यांना पुतळा जाळणं पडलं महागात)

डॉक्टरांनी मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं

यानंतर, गाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत करून मुलाचा जीव वाचवला. डॉक्टर नितिन कुमार यांनी सांगितलं की,'जेव्हा मुलाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं त्यावेळेस त्याची प्रकृती अतिशय नाजूक होती. आम्ही त्याला लगेचच व्हेंटिलेटरवर ठेवलं. फुफ्फुसांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याच्या छातीत ट्युब टाकण्यात आली. यादरम्यान, त्याला एकदा कार्डिअॅक अरेस्टदेखील आला. पण 23 दिवसांच्या सलग उपचारांनंतर आता मुलाची प्रकृती सुधारत आहे.

Loading...

(पाहा :'त्या' दिवशी मुथ्थुट फायनान्समध्ये तरुणाची कशी झाली हत्या?नांगरे पाटलांचा खुलासा)

चाउमीनमध्ये असतं अपायकारक अॅसिड

'चाउमीनमध्ये एक विशिष्ठ प्रकारची चव आणण्यासाठी त्यामध्ये जिवाला धोका निर्माण होईल असं अॅसिड वापरलं जातं. यामुळे शरीराचे प्रचंड नुकसान होते. यामुळे केवळ फुफ्फुसांनाच नाही तर किडनी तसंच  यकृतालादेखील गंभीर इजा होण्याचा धोका असतो', अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

VIDEO : मिशा काय भुवया ठेवणार नाही, उदयनराजेंचं थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...