सैन्यात निकृष्ट जेवणाची पोलखोल करणाऱ्या तेजबहाद्दुरच्या मुलाची आत्महत्या

सैन्यात निकृष्ट जेवणाची पोलखोल करणाऱ्या तेजबहाद्दुरच्या मुलाची आत्महत्या

मागील वर्षी सीमा सुरक्षा दलाचा जवान तेजबहाद्दुर यादव याने लष्कारात कशा प्रकारे निकृष्ट जेवण मिळते याचा गौप्यस्फोट केला होता.

  • Share this:

22 जानेवारी : मागील वर्षी सीमा सुरक्षा दलाचा जवान तेजबहाद्दुर यादव याने लष्कारात कशा प्रकारे निकृष्ट जेवण मिळते याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावेळी त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर त्याला सैन्यातून काढून टाकण्यात आले होते. अशी माहिती मिळतेय की, तेजबहाद्दुर यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. तेजबहाद्दुर यांच्या 22 वर्षीय मुलगा रोहित याने आत्महत्या केली असून त्याचा मृतदेह राहत्या घरी मिळाला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी ही घटना घडली.

हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्हाला फोनवरून माहिती मिळाली की, रोहितने आत्महत्या केली. घटनास्थळी जेव्हा आम्ही पोहोचलो, तेव्हा खोलीचे दार आतून बंद होते. आतमध्ये गेल्यावर रोहितचा मृतदेह हा पलंगावर पडलेला होता. त्याच्या हातात एक पिस्तुल होती. त्याचे वडील हे कुंभ मेळाव्यात गेले होते. त्यावेळी त्याने आत्महत्या केली.'

स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित हा दिल्ली विद्यापीठात शिकत होता. सुट्टी असल्यामुळे तो गावी आला होता. त्याचे वडील तेजबहाद्दुर यादव हे कुंभ मेळ्याला गेले होते. तर आई घरीच होती. जेव्हा त्याने आत्महत्या केली, तेव्हा आई घरी नव्हती. घरी आल्यानंतर रोहितने आत्महत्या केल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

या प्रकरणामुळे तेजबहाद्दुर आला होता चर्चेत

2017 मध्ये जानेवारी महिन्यात बीएसएफचा जवान तेजबहादुर यादव याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये जवानांना कशा पद्धतीने निकृष्ट जेवण दिलं जात याबद्दल खुलासा केला होता. सीमेवर अहोरात्र आम्ही पहारा देतो, पण निकृष्ट जेवण दिलं जातं, असा आरोप त्याने केला होता. तेजबहादुरच्या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आले होते.

=======================

First published: January 22, 2019, 11:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading