रुग्णाच्या जिवाशी खेळ! वृद्धाला MRI मशीनमध्ये ठेवून विसरला टेक्नीशियन, मग...

रुग्णाच्या जिवाशी खेळ! वृद्धाला MRI मशीनमध्ये ठेवून विसरला टेक्नीशियन, मग...

एका हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यानं रुग्णाच्या बाबतीत दाखवलेल्या निष्काळजीपणाची गंभीर घटना समोर आली आहे.

  • Share this:

चंदिगड, 23 सप्टेंबर : एका हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यानं रुग्णाच्या बाबतीत दाखवलेल्या निष्काळजीपणाची गंभीर घटना समोर आली आहे. एका 61 वर्षांच्या वृद्धाला MIR मशीनमध्ये ठेवल्यानंतर बाहेर काढण्यास येथील कर्मचारी पूर्णतः विसरून गेल्याचे वृत्त समोर आलं आहे. हरियाणाच्या पंचकूला येथील एमआरआय अँड सिटी स्कॅन सेंटरमधील ही धक्कादायक घटना आहे.  राम मेहर असं रुग्णाचं नाव आहे. यादरम्यान मशीनमध्ये राम यांचा श्वास गुदमरू लागला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते हात-पाय मारू लागले, पण बेल्ट बांधलेला असल्यानं त्यांना शारीरिक हालचाल करण्यात अडथळा येत होता. पण तरीही राम मेहर यांनी हार पत्करली नाही. जीव वाचवण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करत होते. यादरम्यानच त्यांच्या शरीराला बांधलेला बेल्ट तुटला आणि ते सुखरूप मशीनमधून बाहेर आले.

(वाचा : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बंद पाडली 50 हजार मंदिरं, आता मोदी सरकार उघडणार दारं!)

याप्रकरणी राम मेहर यांनी एमआरआय अँड सिटी स्कॅन सेंटरच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत त्यांची तक्रार हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांच्याकडे केली. शिवाय, याबाबत आरोग्य विभागाकडेही तक्रार नोंदवली.  'जर 30 सेकंदांमध्ये मशीनमधून बाहेर आलो नसतो तर आपल्यावर मृत्यू ओढावला असता', असं राम यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

(वाचा :अमित शहांकडून नवीन ओळखपत्राचा प्रस्ताव; आधारसह सर्वकाही असेल एकाच कार्डमध्ये)

...मग चूक नेमकी कोणाची?

या प्रकरणी एमआरआय सेंटरच्या प्रभारीसोबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, 'घडलेल्या प्रकारात टेक्नीशियनची कोणतीही चूक नाही. टेक्नीशियननंच रुग्णाला बाहेर काढलं. रुग्णाचं 20 मिनिटांचं स्कॅनिंग होतं. पण शेवटच्या दोन मिनिटांमध्ये रुग्ण मशीनमध्ये घाबरला आणि आतमध्ये त्यांनी हालचाल करण्यास सुरुवात केली'.

हालचाल करण्यास केली होती मनाई

एमआरआय सेंटरच्या प्रभारीनं सांगितलं की, 'टेक्नीशियनं वृद्ध रुग्णाला शारीरिक हालचाली करण्यास मनाई केली होती. पण शेवटच्या एक मिनिट उर्वरित असताना टेक्नीशियननं पाहिलं तर रुग्ण स्वतःहून बाहेर आला होता. अखेर टेक्नीशियननंच त्यांना मशीनमधून बाहेर काढलं'.

(वाचा :...तर आम्ही बालाकोटच्या पुढे जाऊ; लष्कर प्रमुखांचा पकिस्तानला निर्वाणीचा इशारा)

VIDEO: थोडी वाट बघा... मुख्यमंत्र्यांनी युतीच्या निर्णयाबाबत केलं आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 05:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading