Home /News /national /

Crime News: 7 महिन्याच्या गर्भवती महिलेची माहेरी आत्महत्या, 4 तासात पतीनं उचललं टोकाचं पाऊल

Crime News: 7 महिन्याच्या गर्भवती महिलेची माहेरी आत्महत्या, 4 तासात पतीनं उचललं टोकाचं पाऊल

सात महिन्यांच्या गरोदर (seven month pregnant woman) महिलेनं आपल्या माहेरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केली.

    अंबाला, 03 मार्च: हरियाणातील (Haryana) अंबाला जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जिथे घरगुती कलहामुळे सात महिन्यांच्या गरोदर (seven month pregnant woman) महिलेनं आपल्या माहेरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (committed suicide) केली. त्यानंतर 4 तासातच तिच्या पतीनं पिंजोर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाला पोलिसांनी (Ambala Police) महिलेच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सासरकडच्या दोन जणांविरुद्ध हुंड्यासाठी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी दुसऱ्या घटनेच्या संदर्भात पंचकुला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीत मृत महिलेच्या वडील हेतराम यांनी सांगितलं की, 5 मे 2021 रोजी त्यांनी त्यांची मुलगी जलधारा हिचा विवाह मांडवाला पिंजोर येथील राजूसोबत केला होता. लग्नात हुंडा जास्त दिला गेला होता. हेतराम यांच्या म्हणण्यानुसार, पती राजू आणि सासू सरस्वती तिच्या मुलीचा लग्नानंतर छळ करत होते. यावरून राजू आणि त्याची आई सरस्वती यांनी जलधाराला मारहाण केली होती. याबाबत अनेकवेळा वाद सोडवण्यात आला. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी सुमारे 7 महिन्यांची गरोदर होती. BCCI चा मोठा निर्णय, शिखर धवनचे होणार 4 कोटींचे नुकसान   15 दिवसांपूर्वी जलधारासह तिचा पती राजू आणि त्याच्या आईनं तिला मारहाण करून घराबाहेर काढलं होतं. त्यामुळे ते आपल्या मुलीला घरी घेऊन आले. पत्नी आणि मुलासोबत कामावर गेले असता त्यांच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. सासरच्या छळाला कंटाळून आपल्या मुलीनं मृत्यूला कवटाळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी पत्नीच्या मृत्यूनंतर तब्बल चार तासांनी पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू लग्नापूर्वी काबाडकष्ट करायचा. मात्र लग्नानंतर त्यांनी काम करणं बंद केलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह जेमतेम होत होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात वाद होत होते.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Haryana, Pregnant woman, Suicide

    पुढील बातम्या