हरियाणातल्या या बड्या नेत्याचा बाळासाहेब ठाकरे स्टाईलने आंदोलनाचा इशारा

हरियाणातल्या या बड्या नेत्याचा बाळासाहेब ठाकरे स्टाईलने आंदोलनाचा इशारा

हरियाणातल्या तरुणांनाच रोजगार द्या, नाहीतर ठाकरे स्टाईल आंदोलन करणार.

  • Share this:

चंदीगड 11 जुलै : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं देशभर आकर्षण आहे. शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी आपल्या आंदोलनाची एक स्टाईल निर्माण केली. नंतर मनसेप्रमुख राज ठाकरेंनीही आपली एक स्टाईल निर्माण केली. गरज पडली तर 'मारा-झोडा-फोडा' अशी ती स्टाईल होती. आता या स्टाईलचं आकर्षण हरियाणातल्या एका बड्या नेत्याला पडलंय. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे नातू आणि जननायक जनता पार्टीचे नेते  दुष्यत चौटाला यांनी गरज पडली तर बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

दलित मुलाशी लग्न करणाऱ्या BJP आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

हरियाणात बेरोजगारीचं मोठं संकट निर्माण झालंय. इतर राज्यातले लोकही हरियाणात नोकरीसाठी येत असतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे राज्यभर तरुणांमध्ये असंतोष आहे. इथल्या कारखाण्यांनी स्थानिक तरुणांनाच रोजगार द्यावा अशी मागणी दुष्यंत चौटाला यांनी केलीय. पहिले इथल्याच लोकांना काम मिळालं पाहिजे असंही ते म्हणाले.

बाळासाहेबांनी 70 आणि 80 च्या दशकात भूमीपुत्राचा नारा दिला होता. नंतर राज ठाकरेंनी 'महाराष्ट्र पहिले' अशी गर्जना करत आंदोलन उभं केलं होतं. परप्रांतातले लोंढे बंद व्हावेत, स्थानिकांना काम मिळावं अशा त्यांच्या मागण्या होत्या. त्यासाठी अनेकदा त्यांनी कायदाही हातात घेतला. नंतर त्यालाच 'खळ खट्याक' असंही नाव पडलं. शिवसेना आणि मनसैनिकांनी अधिकाऱ्यांना मारायलाही कमी केलं नाही.

मोहिते पाटलांच्या कट्टर विरोधकाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लावणार हजेरी

त्यांच्या या आंदोलनावर देशभरातून टीका झाली मात्र बाळासाहेब किंवा राज यांनी त्याची कधीच पर्वा केली नाही. ज्यांना जी भाषा कळते त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती.

परदेशात शिकून आलेल्या दुष्यंत चौटाला यांनीही आता तीच भूमिका घेतलीय. बाळासाहेब आणि राज यांच्या आक्रमक स्टाईलने आंदोलन करायची वेळ आली तर आम्ही मागेपुढे पाहणार नाही असा इशारही त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारला दिलाय. दुष्यंत चौटलांच्या या भूमिकेमुळे हरियाणात विधानसभेच्या तोंडावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

First published: July 11, 2019, 3:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading