• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • छातीत आरपार गेल्या 2 लोखंडी सळ्या, 5 तासांच्या ऑपरेशननंतर तरुणाची झाली अशी अवस्था

छातीत आरपार गेल्या 2 लोखंडी सळ्या, 5 तासांच्या ऑपरेशननंतर तरुणाची झाली अशी अवस्था

रोहतकमध्ये (Rohtak) डॉक्टरांनी एका तरुणाची एक आगळीवेगळी सर्जरी केली आहे.

 • Share this:
  हरियाणा, 31 ऑक्टोबर: रोहतकमध्ये (Rohtak) डॉक्टरांनी एका तरुणाची एक आगळीवेगळी सर्जरी केली आहे. डॉक्टरांनी अनोखी शस्त्रक्रिया करून तरुणाच्या छातीतून आरपार गेलेल्या दोन लोखंडी सळ्या 5 तासांच्या यशस्वी (5-hour surgery) शस्त्रक्रियेनंतर बाहेर काढल्या आहेत. शुक्रवारी रात्री 9 ते 2 वाजेपर्यंत हृदय शस्त्रक्रिया विभागात 18 वर्षीय करणच्या लोखंडी रॉडवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे 5 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये कार्डिओ सर्जरी आणि ऍनेस्थेशिया विभागाच्या डॉक्टरांनी स्वतःच्या मेहनतीनं ही अनोखी शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रियेनंतर तरुणाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. आता रुग्णाची प्रकृती ठिक आहे. त्यानंतर रुग्णाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. नेमकं घडलं कसं? संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण हा तरुण दुचाकीवरून घरातून तेल आणण्यासाठी जात होता. तेव्हा रस्त्यात त्याची बाईक पुढेसळ्या आणि लादी घेऊन जाणाऱ्या गाडीला धडकली. या धडकेत दोन सळ्या त्याच्या छातीतून आरपार गेल्या. हेही वाचा-  IND vs NZ: न्यूझीलंडच्या मॅचपूर्वी टीम इंडियाची पार्टी, शार्दुल-इशाननं केला धमाल डान्स; VIDEO  त्यानंतर गावकऱ्यांनी हुशारीनं काम करत त्या लांब सळ्या कापल्या आणि करणला पीजीआयमध्ये दाखल केले. शस्त्रक्रियेनंतर करणला आणखी काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने सुटकेचा नि:श्वास सोडला. डॉक्टरांनी लोकांना सल्ला दिला आहे की, जर अशी घटना एखाद्यासोबत घडली तर रुग्णाच्या अंगातून गेलेल्या लोखंडी सळ्या आणि इतर तीक्ष्ण वस्तू बाहेर काढू नका आणि त्याला थेट डॉक्टरकडे घेऊन जा. असं केल्यानं रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. दोन सळ्या आरपार गेल्या होत्या करणचे वडील कर्मबीर यांनी म्हणाले की, संध्याकाळी एका गावकऱ्याने त्यांना सांगितले की त्यांच्या मुलाचा अपघात झाला आहे आणि दोन सळ्या त्याच्या छातीत घुसल्या आहेत. घटनास्थळी करणची अवस्था पाहून खूप घाबरलो होतो. मात्र गावातील लोकांनी सळ्या कापून छोट्या केल्या आणि नंतर त्याला खानपूर मेडिकल कॉलेजमध्ये नेलं. तेथून त्याला रोहतक पीजीआयमध्ये रेफर करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. ज्यासाठी मी डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. डॉक्टरांनी माझ्या मुलाचा जीव वाचवला. हेही वाचा- कोरोनाचा पुन्हा उद्रेक, 99 टक्के नमुन्यांमध्ये आढळलं  Delta Variant पंडीत बीडी शर्मा PGIMS रोहतकचे कार्डियो सर्जरी विभागाचे वरिष्ठ डॉक्टर शमशेर लोहचब यांनी सांगितलं की, या रुग्णाला रात्री आणण्यात आलं. पहिल्यांदा त्याच्या छातीत घुसलेल्या सळ्या कापून लहान केल्या गेल्या आणि त्याची स्थिती पाहून डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने तातडीने शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली. रुग्णाच्या शरीरात 40 फूटपर्यंत सळ्या गेल्या होत्या. सळ्यामुळे रुग्णाच्या दोन्ही फुफ्फुसांना इजा झाली होती. अशा परिस्थितीत रुग्णाला ओपन हार्ट सर्जरीच्या ऑपरेशन थिएटरमध्ये हलवून शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. सुमारे 5 तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत सळ्या यशस्वीरित्या काढण्यात आल्या. फुफ्फुसांचे नुकसान स्टेपल्सद्वारे ठिक करण्यात आले. ज्यामुळे फुफ्फुसातील रक्तस्त्राव थांबला. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण धोक्याबाहेर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. डॉक्टर शमशेर म्हणाले की, करणच्या कुटुंबीयांनी त्याच्या शरीरातील सळ्या काढल्या नाहीत. जे त्यांनी चांगलं काम केलं. ज्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना मला असं सांगायचं आहे की, असा अपघात जर एखाद्यासोबत झाला तर घटनास्थळी शरीरातील कोणतीही वस्तू काढण्याचा प्रयत्न करु नका.
  Published by:Pooja Vichare
  First published: