गर्भवती गर्लफ्रेंडसह त्यानं केला विवाह, 3 महिन्यानंतर आयुष्य उद्ध्वस्त करणारी मिळाली शिक्षा

गर्भवती गर्लफ्रेंडसह त्यानं केला विवाह, 3 महिन्यानंतर आयुष्य उद्ध्वस्त करणारी मिळाली शिक्षा

प्रेम विवाह करणाऱ्या एका जोडप्याला नातेवाईकांच्या निष्ठुर वागणुकीमुळे आयुष्यभरासाठी जीवघेणी यातना मिळाली आहे.

  • Share this:

चंदिगड, जून 25 : प्रेम विवाह करणाऱ्या एका जोडप्याला नातेवाईकांच्या निष्ठुर वागणुकीमुळे आयुष्यभरासाठी जीवघेणी यातना मिळाली आहे. विवाह करण्यापूर्वी या जोडप्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले होते, त्यामुळे युवती गर्भवती झाली. पण तरुणानं आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न होईपर्यंत तरुणी तीन महिन्यांची गर्भवती झाली होती. या जोडप्याचा विवाहसोहळा उत्तमरित्या पार पडला. लग्नानंतर युवती आपल्या माहेरी गेली. येथे तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला. कुटुंबीयांनी तिचा जबरदस्तीनं गर्भपात केला. शिवाय, तिला पतीला भेटण्यापासूनही रोखलं जात आहे. हरियाणातील रेवाडी येथील ही घटना आहे.

लग्नानंतर 3 महिन्यांनंतर आयुष्य उद्ध्वस्त

पीडित तरुणांनं प्रेयसी गर्भवती असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 4 मार्च 2019 रोजी त्यानं आपल्या प्रेयसीसोबत हिंदू रीतिरिवाजानुसार विवाह केला. पण लग्नानंतर तीन महिन्यांनी त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. माहेर गेलेली पत्नी सासरी पुन्हा आलीच नाही.

(पाहा:VIDEO: पाणी बिलाच्या थकबाकीवर मुख्यमंत्री म्हणाले...)

पोलिसात घेतील धाव

पीडित तरुणानं पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, जिवाला धोका असल्याचं सांगत तरुणानं प्रेमविवाहानंतर हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीमध्ये तरुणाला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

(पाहा:VIDEO: भरचौकात हल्लेखोरांकडून युवकाला बेदम मारहाण)

तरुणीच्या कुटुंबीयांचा लग्नाला होता विरोध

तरुणांनं सांगितलं की,'आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रेयसीचे कुटुंबीयांचा यास विरोध होता. यामुळे आम्ही पळून जाऊन लग्न केलं. लग्नाच्या तीन दिवसांनंतर 7 मार्च रोजी आम्ही सुरक्षा मिळवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली.'

(पाहा:SPECIAL REPORT: या देशात 500 हिंदूंचं जबरदस्तीनं धर्मांतर)

सासरी येणं-जाणं झालं सुरू

लग्नानंतर नातेवाईकाच्या मध्यस्थीमुळे माझं आपल्या सासरी येणं-जाणं सुरू झालं होतं. सर्व काही ठीक चाललं असल्यानं भीतीदेखील कमी झाली होती. पण पत्नीच्या कुटुंबीयांच्या मनातील वाईट विचार संपले नव्हतेच. त्यांनी माझ्या पत्नीचा जबरदस्तीनं गर्भपात केल्याची माहिती मला पोलिसांच्या माध्यमातून समजली.

VIDEO : मीच रेल्वे चालवणार, मनोरुग्ण तरुणाने घेतला इंजिनचा ताबा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: marriage
First Published: Jun 25, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading