VIDEO अमित शहांनी योगासनं केलीत आणि नंतर लोकांनी मॅट्स पळवल्या

कार्यक्रम संपला आणि या लोकांच्या मनावरचं नियंत्रण सुटलं. सगळेच लोक योग विसरून या मॅट्सच्या मोहात पडले आणि गोंधळाला सुरुवात झाली.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 06:12 PM IST

VIDEO अमित शहांनी योगासनं केलीत आणि नंतर लोकांनी मॅट्स पळवल्या

रोहतक, 21 जून : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधानांसहीत देशभरातल्या मंत्र्यांनी विविध शहरांमध्ये योगासनं केलीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हरियानातल्या रोहतकमधल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. अमित शहांसोबतच मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही या कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रम झाल्यानंतर जे लोक बघायला आले होते ते योग मंडपात घुसले आणि त्यांनी  मंडपात मॅट्स टाकल्या होत्या त्या पळवून नेल्या आणि एकच गोंधळ उडाला. याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

रोहतकच्या मेला ग्राऊंड मैदानावर हरियाणा सरकारने योग दिना निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला खुद्द अमित शहा येणार असल्याने त्याची चांगली जाहीरातही  करण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि सरकारी अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गणमान्य व्यक्ती येणार असल्याने मान्यवरांची योगासनं बघण्यासाठी लोकांनीही गर्दी केली.

वक्त्यांनी कार्यक्रमात मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग असल्याचं सांगितलं. योगामुळे शरीरासोबतच मनावरही माणूस नियंत्रण मिळलायला शिकतो असंही त्यांनी सांगितलं. प्रत्यक्ष योगासनं आणि प्राणायम करणाऱ्या मान्यवरांबरोबरच हा कार्यक्रम बघायला आलेले लोकही हे योगासनाचे धडे मन लावून ऐकत होते.

Loading...

कार्यक्रम संपला आणि या लोकांच्या मनावरचं नियंत्रण सुटलं. योगासनांसाठी आणलेल्या आकर्षक रंगीबेरंगी योगा मॅट्सवर त्यांची नजर गेली. सगळेच लोक योग विसरून या मॅट्सच्या मोहात पडले आणि एका नाट्याला सुरुवात झाली. लोक मंडपात घुसले आणि मॅट्स गुंडाळून पळवून नेऊ लागले. यात महिलाही आघाडीवर होत्या. हातात दिसेल ती मॅट पळविण्याचा लोकांचा प्रयत्न होता. आयोजकांना लोकांना आवरता आवरता घाम फुटला आणि शेवटी त्यांना बाहेर काढण्यात आलं. पण तोपर्यंत अर्ध मैदान लोकांनी रिकामं झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 21, 2019 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...