Home /News /national /

हत्येचा थरारक प्रकार, महिलेचे दोन तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह

हत्येचा थरारक प्रकार, महिलेचे दोन तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह

घरी एकट्या राहणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    यमुनानगर, 24 जून : घरी एकट्या राहणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. धक्कादायक बाब म्हणजे महिल्या मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात आले होते. नग्न अवस्थेत मृतदेहाचा एक भाग फ्रिजमध्ये तर दुसरा फ्रिजच्या बाहेर फेकण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या महिलेचं घर सील केलं आहे. घटनास्थाळी सामानही सगळं विस्कळीत झाल्याचं दिसून आलं. या महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 57 वर्षांची ही महिला रेल्वे वर्कशॉपच्या कॅन्टीनमध्ये काम करत होती. हे वाचा-हा तर हैवान? डॉक्टरने गर्भपात करून अर्भकाचे केले पाच तुकडे, नगरमधली घटना मंगळवारी संध्याकाळी उशिरा रेल्वे वर्कशॉप कॉलनीमध्ये राहणाऱ्या 57 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नग्न अवस्थेत महिलेच्या मृतदेहाचे दोन तुकडे केलेले पोलिसांना आढलले. एक फ्रिजमध्ये तर दुसरा बाहेर होता. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus in india, Coronavirus india, Haryana, Haryana news

    पुढील बातम्या