प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाची 'बनवा बनवी'; लोकांनी धू धू धुतला...पाहा VIDEO

प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाची 'बनवा बनवी'; लोकांनी धू धू धुतला...पाहा VIDEO

विवाहित प्रेयसीचा पती रुग्णालयात उपचार घेत असताना याच संधीचा फायदा घेऊन प्रेयसीला भेटण्यासाठी तरुण येत होता

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : प्रेयसीला भेटण्यासाठी मुलं काय काय करू शकतात याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोमिओनं आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी चक्क मुलींचे कपडे घालण्याचं धाडस केलं आहे. हा तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मोठ्या धाडसानं निघाला खरा मात्र त्याची बनवा-बनवी सपशेल फसली आणि त्याला चपल्लांचा प्रसाद मिळाला नेमकं काय आहे हे प्रकरण आणि काय घडलं जाणून घेऊया.

विवाहित प्रेयसीचा पती रुग्णालयात उपचार घेत असताना याच संधीचा फायदा घेऊन प्रेयसीला भेटण्यासाठी तरुण येत होता मात्र तिथे कुणालाही संशय येऊ नये आणि आपण पकडले जाऊ नये यासाठी त्यानं मुलींचे कपडे घातले आणि मेकअप केला. मात्र रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला त्याच्यावर आधीच संशय आला होता. मात्र हा संशय खरा करण्यासाठी त्यानं प्रश्नांची सरबत्ती केली.

हे वाचा-धक्कादायक! पुण्याच्या आयटी हबमध्ये अमली पदार्थांची विक्री; 25 किलो गांजा जप्त

प्रेयसीचा पती Rohak PGI रुग्णालयात उपचार घेत होता. याच संधीचा फायदा घेऊन प्रेयसीला भेटण्यासाठी हा तरुण वेश बदलून आला होता. मात्र त्याची बनवा बनवी सिक्युरिटी गार्डनं सर्वांसमोर आणली आणि तिथल्या नागरिकांनी त्याची चांगलीच धुलाई केली.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकानं पोलिसांना कळवली आणि हा तरुण पळून जाऊ नये म्हणून बेदम मारहाण केल्यानंतर त्याला बेडला बांधून ठेवण्यात आलं. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत या तरुणाला ताब्यात घेतलं आणि संपूर्ण प्रकार काय याची चौकशी केली. या युवकाला पोलिसांनी कोठडीत ठेवलं आणि हा संपूर्ण प्रकार हरियाणातील रोहतक इथला असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 24, 2020, 2:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading