नज्योतसिंग सिद्धूला पाकिस्तानशी मैत्री महागात, स्टार प्रचारकांच्या यादीतून हकालपट्टी

नज्योतसिंग सिद्धूला पाकिस्तानशी मैत्री महागात, स्टार प्रचारकांच्या यादीतून हकालपट्टी

पाकिस्तानात जावून इम्रान खान आणि त्यांच्या लष्करप्रमुखांचं कौतुक केलं होतं ते कौतुक सिद्धू यांना महागात पडलं असं बोललं जातंय.

  • Share this:

चंदिगड 04 ऑक्टोंबर : काँग्रेसचे नेते नज्योतसिंग सिद्धू हे आपल्या खास भाषणांसाठी आणि शेरो शायरींसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात त्यांना प्रचारासाठी कायम मागणी असते. मात्र हरियाना आणि महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुका सुरू असताना काँग्रेसनं जी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय त्यातून सिद्धू यांचं नाव गायब आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातून संजय निरुपम यांचंही नाव गायब आहे. सिद्धूने पाकिस्तानात जावून इम्रान खान आणि त्यांच्या लष्करप्रमुखांचं कौतुक केलं होतं ते कौतुक सिद्धू यांना महागात पडलं असं बोललं जातंय.

कर्तारपूर कॉरीडॉरच्या उद्घाटन कार्यक्रमात सिद्धू यांना पाकिस्तानने बोलावलं होतं. अंतर्गत विरोध असतानाही ते कार्यक्रमाला हजर राहिले आणि पाकिस्तानचे गोडवेही गायले त्यावरून त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली होती. सिद्धू यांनी प्रचार केल्यास भाजप त्याचा वापर करून राष्ट्रवादावर रान माजवेल अशी शक्यता वाटल्याने काँग्रेसने त्याचं नाव प्रचारकाच्या यादीतून काढून टाकलंय.

धनंजय आणि पंकजा मुंडे यांची संपत्ती जाहीर, कुणाचं पारडं आहे जड?

महाराष्ट्र आणि हरियाना या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती बाहेर येतेय. संजय निरुपम यांच्या आरोपानंतर त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय. दिल्लीतले नेते स्थानिक गोष्टींचा विचार न करता निर्णय घेतात असा आरोप निरुपम यांनी केला होता. त्यानंतर ही चर्चा सुरू झाली असून काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यात दुरावा निर्माण झालाय याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू झालीय. निरुपम यांनी अप्रत्यक्ष सोनिया गांधी यांच्या जवळच्या नेत्यांवर आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकरांना फोन केला होता पण आमचं जमलं नाही - ओवेसी

राहुल गांधी यांनी राजीनामा देताना सोनिया गांधी यांना विश्वासात घेतलं नव्हतं. नंतर त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून सोनियांनी राहुल गांधींना समजविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तो निर्णय त्यांनी बदलला नाही. नंतर त्यांनी दबावही आणण्याचा प्रयत्न केला तोही त्यांनी झुगारून लावला होता. प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपद सांभाळावं असं सोनियांना वाटत होतं मात्र राहुल गांधी यांनी तोही निर्णय होऊ दिला नाही त्यामुळं सोनिया गांधी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काँग्रेस घराण्याच्या बाहेरच्याच माणसाकडे जबाबदारी दिली जावी असं राहुल गांधी यांनी वारंवार जाहीर केलं. त्यामुळे अखेर सोनिया गांधी यांनाच पुढे येवून काँग्रेसचं बुडतं जहाज सांभाळावं लागलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 10:17 PM IST

ताज्या बातम्या