Home /News /national /

विष पिऊन ब्रोकरची आत्महत्या, 6 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिली अंगावर काटा आणणारी कथा

विष पिऊन ब्रोकरची आत्महत्या, 6 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिली अंगावर काटा आणणारी कथा

विष पिऊन एका ब्रोकरनं आत्महत्या केली आहे. विष प्राशन करण्यापूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

    हरियाणा, 25 डिसेंबर: हरियाणातील (Haryana) कर्नालमधील (Karnal News) बल्ला गावात एका ब्रोकरनं पैशाच्या व्यवहाराला कंटाळून विष (drinking poison) पिऊन आत्महत्या केली. विष प्राशन करण्यापूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. नरेला अन्न मंडई आणि अलीगड मंडईतील व्यापारी पैशासाठी दबाव आणत होते. रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता सुसाईड नोटच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. मृताचा भाऊ करमचंद यांनी सांगितले की, लहान भाऊ दीपक याचे नरेला धान्य मार्केटमध्ये ब्रोकरचं दुकान आहे. त्याला अलीगढमधून सुमारे 80 लाख रुपये घ्यायचे होते. हे पैसे धान्य बाजार, नरेला येथून उचलून दिले होते. नरेला धान्य बाजारातील लोक पैशासाठी दबाव टाकत होते. ते त्याचा परवाना रद्द करण्यासाठी दबाव आणत होते. तसंच ज्याला पैसे द्यायचे होते तो अलीगढला निघून गेला. नंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्याही देऊ लागल्या. मृत ब्रोकरला दोन मुले आहेत. विष खाल्ल्यानंतर सुरु झाल्या उलट्या दीपकला उलट्या होत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टरला बोलावण्यात आलं. यानंतर त्याला कर्नाल येथं आणलं आणि तेथे काही सुधारणा झाली, मात्र काही वेळेनंतर त्याचा मृत्यू झाला. सहा पानी सुसाईड नोट त्याच्या खिशातून सुसाईड नोट सापडली. ज्यामध्ये आमचा व्यवहार जवळपास बरोबर असल्याचे लिहिलं होतं. जेवढे द्यायचे होते तेवढेच घ्यायचे होते. यावेळी घेणाऱ्यांनी जबरदस्त दबाव आणला होता. मार्चपर्यंत हिशोब करू, असे अनेकवेळा सांगितले, मात्र जास्त दबावामुळे ते सहन झालं नाही. मृत ब्रोकरनं 6 पानी सुसाईड नोट लिहिली आहे. पोलीस काय म्हणाले तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, बल्ला येथे राहणारा दीपक नरेला येथे ब्रोकरचं दुकान चालवतो. मंगळवारी 850 पोती भाताची आवक झाली होती. शेजारच्या ब्रोकरनं ते विकत घेतले होते. खरेदी केल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला. मृत ब्रोकरनं 6 पानी सुसाईड नोट लिहिली. गुरुवारी धान्य बाजारातून परत आल्यानंतर त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केलं आणि शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल,असंही पोलिसांनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Haryana

    पुढील बातम्या