रक्षाबंधनाच्या 6 दिवसांपूर्वीच कर्तव्य बजावताना भाऊ शहीद, बातमी ऐकून बहीण बेशुद्ध

रक्षाबंधनाच्या 6 दिवसांपूर्वीच कर्तव्य बजावताना भाऊ शहीद, बातमी ऐकून बहीण बेशुद्ध

एक भाऊ देशाच्या संरक्षणासाठी आपलं कर्तव्य बजावत असताना शहीद झाला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 9 ऑगस्ट : रक्षाबंधनाचा सण सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाऊ-बहिणीचं नातं अधिक घट्ट करणारा हा सण. या दिवसाची प्रत्येक बहीण आतुरतेने वाट बघते. पण एक भाऊ देशाच्या संरक्षणासाठी आपलं कर्तव्य बजावत असताना शहीद झाला आहे. सैन्यात भरती झालेल्या हरियाणातील एका जवानाला वीरमरण आलं आहे. कृष्ण कुमार असं शहीद जवानाचं नाव आहे. या घटनेमुळे त्याच्या ताईचा यंदाचा रक्षाबंधन सण अपूर्णच राहणार आहे.

शहीद जवान कृष्ण झज्जर जिल्ह्यातील खेडी गावातील रहिवासी होते.

(वाचा : 'काय सांगतो आणि कधी सांगतो, माणसांचा जीव गेल्यावर?', अजित पवार CM वर भडकले)

ट्रेनिंगदरम्यान गोळी लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शुक्रवारी सकाळी कृष्ण यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. मुलगा शहीद झाल्याचे वृत्त समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शहीद जवान कृष्ण यांचे वडील ओमप्रकाशदेखील भारतीय सैन्यात कार्यरत होते.  काही दिवसांपूर्वी त्याचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला.

(वाचा :'भाजपला 250 जागा तर आम्ही 28 जागांवर गोट्या खेळू काय?' राज ठाकरेंचा घणाघात)

शहीद जवानची आहेत दोन मुलं

दरम्यान, जवळपास 10 वर्षांपूर्वी कृष्ण कुमार यांनी देशासाठी आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय घेतला. देशासाठी अविरत कार्य करण्याच्या उद्देशानं ते भारतीय सैन्यात भरती झाले. कृष्ण यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुलं, एक भाऊ आणि बहीण असा कुटुंब आहे. त्यांच्या एका मुलाचं वय 3 वर्ष तर छोटा मुलगा एक वर्षाचाच आहे.

मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

शहीद जवान कृष्ण यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी संध्याकाळी पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे.

(वाचा :मोदी सरकारनं जम्मू-काश्मीर,लडाखमधील लोकांच्या खात्यात पाठवले 4 हजार रुपये,कारण..)

TikTok वर चमकण्यासाठी पठ्याने नदीत मारली उडी, त्यानंतर जे घडलं त्याचा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 02:04 PM IST

ताज्या बातम्या