पराभूत उमेदवार आभार मानण्यासाठी अनवाणी पोहचला जनतेच्या दारात

पराभूत उमेदवार आभार मानण्यासाठी अनवाणी पोहचला जनतेच्या दारात

विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन लोकांचे आभार मानले आहेत.

  • Share this:

सिरसा, 27 ऑक्टोबर : महाराष्ट्रासोबत हरियाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. इथं निकालानंतर एक अनोखा प्रकार समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अपक्ष उमेदवाराने लोकांचे आभार मानले आहेत. यासाठी अपक्ष उमेदवाराने अनवाणी पायाने चालत लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे आभार मानले. यावेळी अपक्ष उमेदवाराच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही झाली.

हरियाणातील सिरसा विधानभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुल सेतिया यांनी गोपाल कांडा यांच्याविरुद्ध अपक्ष निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना फक्त 602 मतांनी पराभव पत्करावा लागला. गोपाल कांडा हे दबंग नेते म्हणून ओळखले जातात. मतमोजणीवेळी दोघांमध्ये चुरस बघायला मिळाली. शेवटी गोकुळ सेतिया यांना मागे टाकून गोपाल कांडा यांनी 602 मतांनी विजय मिळवला. गोकुळ सेतिया यांना 44 हजार 313 मते मिळाली होती.

गोपाल कांडा यांच्याकडून 602 मतांनी पराभव झाल्यानंतर सेतिया जनतेच्या नजरेत स्वत:ला विजयी समजत असल्याचं सांगतात. ते म्हणाले की, जनतेनं त्यांना साथ दिली आहे. यासाठीची रविवारी लोकांचे आभार मानण्यासाठी सिरसा इथं अनवाणी चालले.

गोकुळ सेतिया म्हणाले की, सिरसातल्या जनतेनं त्यांना जसा आशीर्वाद दिला त्यासाठी त्यांचे पाय धुवून पाणी प्यायलं तरी कमी पडणार नाही. त्यांचा पराभव फक्त 602 मतांनी झाला असला तरी लोकांनी 44 हजार 313 मते दिली. दरम्यान, हरियाणातील अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल विचारले असता त्यावर काही म्हणणार नाही. कारण त्यांनाही जनतेनं आशीर्वाद दिला आहे असंही गोकुळ सेतिया म्हणाले.

VIDEO : अमरावतीमध्ये तुफान राडा, रवी राणा-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमनेसामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: haryana
First Published: Oct 27, 2019 06:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading