'बटण कोणतंही दाबा, मत मिळणार भाजपलाच', BJP उमेदवाराचा खळबळजनक VIDEO VIRAL

'बटण कोणतंही दाबा, मत मिळणार भाजपलाच', BJP उमेदवाराचा खळबळजनक VIDEO VIRAL

मतदानासाठी काही तास उरलेले असताना भाजप उमेदवाराचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये सोमवारी (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानासाठी काही तास उरलेले असताना भाजप उमेदवाराचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हरियाणातील असांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बक्षीस सिंग विर्क यांनी ईव्हीएम संदर्भात केलेलं वादग्रस्त विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामुळे ऐन मतदानापूर्वीच भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत बक्षीस सिंह विर्क?

'तुम्ही कोणतंही बटण दाबलं तरीही मत कमळाच्याच निशाणीला जाणार आहे', असा धमकीवजा इशारा विर्क यांनी मतदारांना दिला आहे. यामुळे विर्क यांच्यावर चौफेर टीका होत आहे. एका सभेदरम्यान त्यांनी हे खळबजनक विधान केल्याची माहिती समोर आली आहे. मतदारांना भाजपला मत देण्याचं आवाहन करताना विर्क यांनी थेट त्यांना धमकीवजा इशारच दिला आहे. 'ईव्हीएममधलं कोणतंही बटण दाबा, मत कमळालाच जाणार', असा खळबळजनक दावा विर्क यांनी केला आहे.

(वाचा : पंकजा मुंडे तब्बल 20 तासांनंतर जनतेसमोर आल्या अन् प्रतिक्रिया न देताच निघून गेल्या)

पुढे त्यांनी असंही म्हटलं की,' जर तुम्ही आज चूक केली, तर याची शिक्षा तुम्हाला पुढील 5 वर्षे भोगावी लागेल. कोणी कोणाला मतदान केलं याची आम्हाला माहिती मिळेलच. पंतप्रधान मोदी आणि मनोहरलाल यांची नजर अतिशय तीक्ष्ण आहे. तुम्ही मत कोणालाही द्या, जाणार तर कमळालाच. कारण आम्ही मशीन सेट केलं आहे', असा खळबळजनक दावा विर्क यांनी भरसभेत केला.

(वाचा :  महाराष्ट्रातील हा उमेदवार आहे सर्वात श्रीमंत, 3.5 कोटींच्या फेरारी कारमधून फिरतो)

विर्क यांनी मतदारांना स्पष्टपणे सांगितलं की, ईव्हीएममध्ये अशी सेटिंग केली ज्यामुळे थेट मत भाजपच्याच पारड्यात पडणार आहे. विर्क यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, विर्क यांनी विधानासोबत  छेडछाड करण्यात आल्याचं सांगत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

(वाचा : 'काल मला जग सोडून जावं वाटलं', धनंजय मुंडेंना अश्रू अनावर)

'बहीण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न', धनंजय मुंडे झाले भावुक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या