एक मिनिट आणि 5 वर्षे वाया, उमेदवाराला विधानसभेचा फॉर्मच भरता आला नाही

एक मिनिट आणि 5 वर्षे वाया, उमेदवाराला विधानसभेचा फॉर्मच भरता आला नाही

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी शेवटचा दिवस होता. अर्ज भरण्यासाठी वेळेत न पोहचल्यानं अधिकाऱ्यांनी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नाहीत.

  • Share this:

कर्नाल, 05 ऑक्टोबर : आयुष्यात वेळेचं महत्त्व वेळोवेळी कोणी ना कोणी सांगत असतो. एक एक सेकंद सुद्धा महत्त्वाचा असतो. आता हरियाणातील एका नेत्याला एका मिनिटाची जबरदस्त किंमत मोजावी लागणार आहे. एक मिनिट उशिर झाल्यानं आता हरियाणा विधानसभा निवडणूक लढवता येणार नाही. शुक्रवारी निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये काही नेतेमंडळी एक ते पाच मिनिट उशिर झाल्यानं अर्ज भरू शकले नाहीत. यामध्ये काही अपक्ष नेत्यांचाही समावेश होता. उशिर झाल्याने अधिकाऱ्यांना अर्ज भरून घेतले नाहीत.

कर्नाल जिल्ह्यातील नीलोखेडी आणि कर्नाल विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी पोहचलेल्या तीन उमेदवारांना उशिरा पोहचण्याचा फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, तीन नेत्यांना पोहचण्यास उशिर झाला.

उमेदवारी दाखल करता न आलेल्यांमध्ये माजी मंत्री राजकुमार वाल्मिकी यांच्या नावाचा समावेश आहे. वाल्मिकी यांनी सांगितलं की, शुक्रवारी अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी पोहचलो होतो. कागदपत्रे पडताळणी करताना नोटरी अटेस्ट करावं लागेल असं सांगितलं. ते करून परत येण्यास दोन मिनिटं वेळ झाला तेवढ्यात अधिकाऱ्यांना अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्याचं सांगितलं.

दुसरीकडे बाढडा इथंही पाच मिनिटांनी एका उमेदवाराचा घात केला. अर्ज जमा करण्यासाठी पोहचल्यानंतर अधिकाऱ्यांनी उशिर झाला असून अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही असं सांगितलं. जनता पार्टीच्या लाल सिंह यांनाही उशिर झाल्यानं अर्ज भरता आला नाही.

अंबाला सिटी विधानसभा मतदार संघातून शिरोमणि अकाली दलाने अभय चौटाला यांना दोन वाजता उमेदवार घोषित केलं. त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची धावपळ उडाली. मात्र, कागदपत्रांची जमवाजमव करेपर्यंत उशिर झाल्यानं त्यांनाही या विधानसभा निवडणुकीला उभा राहता येणार नाही.

VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

Published by: Suraj Yadav
First published: October 5, 2019, 12:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading