एका दिवसात 3 पक्ष बदलून 'या' नेत्याने केला होता अनोखा विक्रम!

एका दिवसात 3 पक्ष बदलून 'या' नेत्याने केला होता अनोखा विक्रम!

निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात देशाच्या राजकारणात हा शब्द आला तरी कसा...

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर: सध्या महाराष्ट्र आणि हरियाणा(Haryana Assembly Election) या दोन राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. दोन्ही राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करून झाले आहेत. आता यापुढे प्रचाराचा धडाका सुरु होईल. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी पक्ष बदलले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलने ही भारतीय राजकारणातील पहिली वेळ नाही. पण यंदा भाजप आणि शिवसेनेत झालेले इनकमिंग पाहता अस चित्र याआधी कधीच पाहायला मिळाले नाही, अशी चर्चा सुरु झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. भाजपने तर वेळोवेळी मेगाभरती केली. संधी मिळेल तेव्हा पक्ष बदलणाऱ्या अशा नेत्यांना आयाराम-गयाराम (Aya Ram Gaya Ram) असे म्हटले जाते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात देशाच्या राजकारणात हा शब्द आला तरी कसा...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी भल्या भल्या एकनिष्ठ, पक्षनिष्ठ मंडळींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसला. काहींनी तर निवडणुका जवळ आल्यानंतर पक्ष बदलला आणि तिकीट मिळाले नाही म्हणू्न पुन्हा स्वगृही देखील परतले. देशाच्या राजकारणात अशा या आराराम-गयाराम कल्चरची सुरुवात हरियाणाच्या राजकारणातून आली. विशेष म्हणजे पक्ष बदलणाऱ्यांसाठी कायदा करण्यात आला तरी देखील त्यात काही फरक पडला नाही. ही घटना आहे 1967मधील हरियाणाच्या राजकाणातील एका घटनेनंतर भारतीय राजकारणात आयाराम-गयाराम हा वाक्यप्रचार वारण्यास सुरुवात झाला. हरियाणातील हरनपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार गयालाल(Gaya Lal) यांनी चक्क एका दिवसात 3 पक्षात प्रवेश केला. देशाच्या राजकारणाच्या इतिहासातील हा एक विक्रमच होता. गयालाल यांचे पुत्र उदयभान होडल मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. 67च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनाच तिकीट मिळाले.

9 तासात बदलले 3 पक्ष

हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री भगवत दयाल शर्मा यांचे सरकरा पडले आणि याच काळात हसनपूरचे अपक्ष आमदार गयालाल यांनी एका दिवसात 3 पक्ष बदलले. गयालाल यांनी प्रथम काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी युनायटेड फ्रन्टमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा 9 तासाच्या आत ते काँग्रेसमध्ये आले. आता तुम्हाला वाटेल गयालाल एवढ्यावच थांबले. तर नाही त्यांनी पुन्हा पक्ष बदलला आणि युनायडेट फ्रन्टमध्ये सहभाग झाले. तेव्हा राज्यातील नेते राव बिरेंद्र सिंह यांनी गया राम, अब आया राम असे वक्तव्य केले होते. वारंवार पक्ष बदलणाऱ्या नेत्यांसाठी तेव्हापासून हा वाक्यप्रचार वापरला जाऊ लागला. गयालाल यांच्या या पक्षबदलामुळे देशाच्या राजकारणाला नवा वाक्यप्रचार मिळाला.

अखेर कायदा करावा लागला

आयाराम-गयाराम संस्कृतीला रोखण्यासाठी अखेर 1985मध्ये राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आमला. पण या कायद्यामुळे परिस्थितीत फार फरक पडला नाही. 19 डिसेंबर 2003 रोजी संसदेने 91वी घटनादुरुस्ती करत पक्षांतर बंदी कायदा आणखी कठोर केला. इतके सर्व प्रयत्न झाल्यानंतर ही राजकीय पक्ष कोणत्या ना कोणत्या पद्धतीने हव्या त्या नेत्याला पक्षात घेतातच.

VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading