Elec-widget

विधानसभा निवडणूक : भारताच्या ‘या’ दोन स्टार खेळाडूंना भाजपकडून तिकीट!

विधानसभा निवडणूक : भारताच्या ‘या’ दोन स्टार खेळाडूंना भाजपकडून तिकीट!

21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांच्या नावाची यादीही जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रातील 288 आणि हरियाणातील 90 विधानसभाच्या जागांसाठी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी भाजपच्या वतीनं हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी (Haryana Assembly Election) 78 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे.

भाजपकडून या यादीमध्ये बबीता फोगट आणि योगेश्वर दत्त यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कुस्तीपटू बबीता फोगटला दादरी तर योगेश्वर दत्तला सोनीपतच्या बरौदामधून उमेदवारी दिली आहे. सध्या भाजपच्या वतीनं 78 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. एकूण 90 जागांसाठी भाजप निवडणूक लढवणार आहे.

वाचा-'ठाकरे' पहिल्यांदाच निवडणूक लढणार; विधानसभेच्या आखाड्यात आदित्य यांची एण्ट्री

वाचा-SPECIAL REPORT : राणेंच्या राजकीय अस्थिरतेचे 'दशावतार' कधी संपणार?

काही दिवसांपूर्वी ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्तनं भाजपमध्ये प्रवेश केला होता. हरियाणाचे भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. योगेश्वरनं निवडणुकीत तिकीट मिळवण्याच्या उद्देशानेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. योगेश्वरनं 2012मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. याशिवाय पद्मश्री विजेता योगेश्वरनं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. निवडणूक लढवण्यासाठी याआधी योगेश्वरनं पोलिस खात्यातील आपली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. हरियाणामध्ये सध्या भाजपची सत्ता असून येथील युवांमध्ये योगेश्वर लोकप्रिय आहे.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणूकांच्या तारखा काही दिवसांआधी जाहीर करण्यात आल्या. यासाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 4 ऑक्टोबर अंतिस तारिख असणार आहे.

वाचा-निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ठाकरेंबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2019 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...