पानीपत, 03 मार्च : टिक टॉक (tik tok)व्हिडीओनं तरुणाईला एवढी भुरळ घातली आहे की आपण काय करतोय याचं भानही उरलं नाही. टिक टॉक करण्याची हौस एक तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 22 वर्षांचा हा तरुण हातात दारूची बाटली घेऊन रेल्वे मार्गावरून थेट वीजेच्या खांबावर चढला. त्याचवेळी वीजेच्या खांबातून येणाऱ्या करंट त्याला लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भीतीपोटी मृत तरुणाला घटनास्थळी सोडून त्याचे मित्र पसार झाले. पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.
पानीपत इथे धर्मगढ परिसरातील 22 वर्षीय तरुण विकास ऊर्फ विक्की आपल्या मित्रांसोबत सोमवारी संध्याकाळी 4 वाजता तीन मित्रांसोबत रेल्वे मार्गावर व्हिडीओ तयार करण्यासाठी गेला होता. तिथे रेल्वे मार्गाजवळ असणाऱ्या वीजेचा खांबावर चढून तो व्हिडीओ काढणार तेवढ्यात त्याला विजेचा झटका झागला आणि होत्याचं नव्हतं झालं.
हे वाचा-तरुणाने स्वत:ची चिता पेटवली आणि त्यावरच झोपला, लोकांनी शूट केला VIDEO
अशाच प्रकारे रविवारी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर इथे टीक टॉक व्हिडीओ तयार करताना तरुणाच्या मृत्यूचा लाईव्ह थरार कॅमेऱ्यात कैद झाला. तरुणानं पोहोण्यासाठी पाण्यात उडी मारल्यानंतर त्याचा मृतदेहच वर आल्यानं टीक टॉक व्हिडीओ तयार करणाराही गांगरुन गेला. ह्या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुजफ्फरनगर में Tik Tok वीडियो बनाते समय युवक की लाइव मौत, सोशल मीडिया पर लाइव मौत की वीडियो वायरल, 18 वर्षीय राज ने झाल के पानी में छलांग लगाई और जान ली गई। pic.twitter.com/lunBzOfTrh
— Shadab Rizvi (@ShadabNBT) March 1, 2020
हा तरुणा 18 वर्षांच्या असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात आहे. या तरुणासोबत काही मित्रही तिथे उपस्थित होते. हा तरुण उंचावर पाण्यात उडी मारण्याचं धडस करणार होता. मात्र त्याला त्याचे मित्र नको करू म्हणून ओरडून सांगत होते. त्यातला एक मित्र व्हिडीओ काढत होता. मात्र कुणाचंही न ऐकता या तरुणानं एक पाऊल मागे जात सूर मारला.
हे वाचा-पाण्याच्या शोधात गच्चीवर आली माकडीण, पुढे काय घडलं पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tik tok