नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : उद्योगपती हर्ष गोएंका यांनी अलीकडेच ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून यावरून लोकांचे दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. ही पोस्ट शेअर करताना हर्ष गोएंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'यांना कसे उत्तर द्यायचे ते मला माहीत नाही...'. ही पोस्ट वाचल्यानंतर काही लोकांनी त्यांच्या कर्मचाऱ्याच्या बायकोची स्थिती समजून घेतली आहे, तर अनेकांचे मत आहे की, घरातून काम संपू नये.
पत्नीने रागाच्या भरात पतीच्या मालकाला लिहलं पत्र
Don’t know how to respond to her….😀 pic.twitter.com/SuLFKzbCXy
— Harsh Goenka (@hvgoenka) September 9, 2021
एका कर्मचाऱ्याच्या पत्नीनं आपल्या पतीबद्दल तक्रार केल्याचा मेसेज हर्ष गोएंका यांनी शेअर केला आहे. तक्रारीमध्ये महिलेने आपण आता कार्यालयातून काम सुरू करावे, असे आवाहन केले आहे.
पत्नीच्या तक्रारीचे पत्र -
'महोदय, मी तुमच्या कर्मचारी मनोजची पत्नी आहे. त्यांना आता कार्यालयातून काम करण्याची परवानगी द्यावी, असे नम्र आवाहन करते आहे. माझ्या पतीला कोविड लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि ते कार्यालयातील सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करतील. जर घरून काम (WFH) अजून काही काळ असेच चालू राहिले तर आमचे लग्न नक्कीच मोडेल. तो दिवसातून दहा वेळा कॉफी पितो, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसतो आणि तिथे गडबड करतो, सतत काहीतरी खाण्यासाठी मागत असतो. मी त्याला कामादरम्यान झोपलेले देखील पाहिले आहे. मला आधीच दोन मुलांची काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.
हे वाचा - पतीच्या मृत्यूनंतर अफेअरबाबत मुलानं केला प्रश्न; भडकलेल्या आईनं तापलेल्या पाईपनं केली मारहाण
लोकांनी पोस्टवर दिल्या भरपूर प्रतिक्रिया
हर्ष गोएंका यांनी याबाबतची पोस्ट शेअर केल्यानंतर या पोस्टला 4,000 पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. एवढेच नाही तर लोकांनी या पोस्टवर अनेक कमेंट्सही केल्या आहेत. हर्ष गोएंका यांनी नेटिझन्सच्या प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत. एकानं लिहिलंय की, 'पुरे झाले, त्याला आता कामावर परत बोलवा.' दुसर्या एकानं लिहिलंय की, 'ती व्यक्ती तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते ते आम्हाला सांगा?'. यासह अनेकांनी यावर वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Work from home