४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा

४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा

हरयाणाच्या सतलोक आश्रमाचा स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर हिसारच्या कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रामपालचे समर्थक आणि पोलीस यांच्या काही वर्षांपूर्वी मोठा संघर्ष झाला होता. या वेळी झालेल्या चकमकीत ६ जणांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर हरियाणात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • Share this:

हिसार, १६ ऑक्टोबर : हरयाणाच्या सतलोक आश्रमाचा कथित संत बाबा रामपालला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ४ महिला आणि एका बालकाची हत्या केल्याचा आरोप या बाबावर होता. आजीवन कारावासासह १ लाखाचा दंडही रामपालला भरावा लागणार आहे.

२०१४च्या नोव्हेंबरमध्ये पोलीस आणि रामपालचे समर्थक यांच्यात संघर्ष झाला होता. यामध्ये ५ महिलांचा आणि एका बालकाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान आज ही सुनावणी असल्यानं हिसार भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १५०० हून अधिक जवान शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत.

या प्रकरणाची २०१४मध्ये न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये युद्ध पेटलं आहे. मुजोर समर्थकांच्या गुंडगिरीविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आणि बाबा रामपालवर देशद्रोहाचा गुन्हही दाखल झाला. बाबा समर्थक आणि पोलिसांमधल्या झालेल्या चकमकीत 6 जणांचा बळी गेला.

कोण आहे हा रामपाल? २०१४मधला हा व्हिडिओ पाहा.

First published: October 16, 2018, 1:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading