Mob Lynching: माणुसकीला काळीमा! हातपाय बांधून एवढं मारलं की गेला तरुणाचा जीव, TikTokवर केला VIDEO शेअर

Mob Lynching: माणुसकीला काळीमा! हातपाय बांधून एवढं मारलं की गेला तरुणाचा जीव, TikTokवर केला VIDEO शेअर

धक्कादायक प्रकार! हातपाय बांधून तरुणाला लाथा बुक्क्याने मारलं, जागीच तोडला तरुणाने जीव.

  • Share this:

तिळक भारद्वाज, प्रतिनिधी

मुनानगर (हरियाणा), 21 फेब्रुवारी : हरियाणातील दामला गावात मॉब लिचिंगचा एक धक्कादायक प्रकार घडला. हरियाणातील या गावात लोकांना घरात चोरी करायला आलेल्या तरुणाला मारहाण केली. एवढंच नाही तर चोरट्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओही त्यांनी टिकटॉकवर टाकला. दरम्यान, या चोराचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे, तर या प्रकरणाची चौकशीही पोलीस करत आहेत.

यमुनानगर गावात दामला येथील एका घरात एक चोर चोरी करण्याच्या इराद्याने शिरला होता. मात्र लोकांना त्याला पकडले, आणि त्याचे हातपाय बांधून त्याला मारहाण केली. ही बाब गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास होती. लोकांनी चोरला पकडले आणि मारहाण केली तेव्हा त्यांनी या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल केला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी चोराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

वाचा-मैत्री, प्रेम, सेक्स आणि गर्भनिरोधक म्हणून सायनाइड देऊन 20 महिलांची हत्या

उपचारा दरम्यान तरुणाचा झाला मृत्यू

दरम्यान, उपचार करत असतानाच या चोरट्याचा मृत्यू झाला. मात्र या चोरट्यानं याआधीही गावात चोरी केली आहे, त्यामुळं गावकरी त्याच्या शोधात होते. हा चोर दुसऱ्या घरात चोरी करत असताना, त्याच्यावर लक्ष ठेऊन असलेल्या लोकांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधत त्याच्याकडून चोरी कबुल करून घेतली. असे सांगितले जात आहे की ही एकूण 4 चोरांची टोळी होती, मात्र एकच चोर या लोकांच्या हाती लागला.

वाचा-'ती' वाजवत राहिली वायोलिन, अन् डॉक्टरांनी केली मेंदूची सर्जरी, पाहा VIDEO

टिक टॉकवर तयार केला VIDEO

ज्या लोकांनी चोराला पकडलं, त्यांना धक्काबुक्की करत चोरानं पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नळाला आपटून चोर खाली पडला. लोकांनी त्याचे हातपाय बांधल्यानंतर लोकांनी टिक टॉक व्हिडिओ तयार केला.

वाचा-Facebook वर खुललं मैत्रीतून प्रेम, भेटण्यासाठी तरुणी पोहोचताच खोलीत केलं बंद आणि...

पोलिसांनी मारेकऱ्यांना केली अटक

मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तर, पोलीस लोकांकडून ओळख पटविण्यासाठी चौकशी करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांच्या हत्येसंदर्भात काही लोकांचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी चौकशीसाठी काही लोकांना ताब्यातही घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 02:01 PM IST

ताज्या बातम्या