अजब योगायोग! अपघातात गमावलेल्या पहिल्या मुलीच्या जन्मदिनीच 2 वर्षांनी झाला दुसऱ्या मुलीचा जन्म

अजब योगायोग! अपघातात गमावलेल्या पहिल्या मुलीच्या जन्मदिनीच 2 वर्षांनी झाला दुसऱ्या मुलीचा जन्म

ही घटना ज्या कुटुंबात घडली ते कुटुंब मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहे.

  • Share this:

चंदीगढ, 16 एप्रिल : आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात. त्यातील काही घटनांकडं पाहिलं की काय योगायोग (Coincidence)आहे,असं आपण नकळत म्हणतो. या घटना काहीशा आश्चर्यकारक म्हणाव्या लागतील, अशा असतात. अशीच एक घटना हरियाणात (Haryana)घडली. या घटनेची जोरदार चर्चा असून,आश्चर्यदेखील व्यक्त होत आहे. ही घटना ज्या कुटुंबात घडली ते कुटुंब मिठाई वाटून आनंद व्यक्त करत आहे.

हरियाणातील डबवालीमधील आदर्शनगर येथील रहिवासी आणि प्रॉपर्टी डिलर हरिश मेहता ऊर्फ हप्पी बाबा यांच्या आयुष्यात ही अनोखी घटना घडली आहे. कुटुंबातील लोक तर या घटनेला ईश्वरी चमत्कार मानत आहेत. परिसरातील प्रत्येक जण या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होत नवजात बालकास पाहण्यासाठी येत आहे. या कुटुंबातील या नवजात बालकाचा जन्म ज्या दिवशी झाला त्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी या कुटुंबाने आपलीप हिली पाच वर्षांची मुलगी एका दुःखद घटनेत गमावली होती. आता दोन वर्षांनी त्याचदिवशी दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्याने मेहता कुटुंबीय खूश आहेत.

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, या घटनेबाबत हरिश मेहता यांनी सांगितले की, आम्ही आमची पहिली मुलगी पहल उर्फ मिठ्ठी हिला एका घटनेत गमवले. योगायोगाने दोन वर्षांनंतर पहलच्या जन्मदिनी म्हणजेच 14 एप्रिलला आमच्या घरात दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. खरं तर हा योगायोग आहे. परंतु माझे कुटुंबीय याला ईश्वरी चमत्कार मानत आहेत. आमची पहिली मुलगी पहल हिचा हा पुनर्जन्म आहे अशीच सगळ्यांची कल्पना आहे. त्यामुळे या दुसऱ्या मुलीचे नावही आम्ही पहल ऊर्फ मिठ्ठी ठेवलं आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातावेळी (Accident)पहल 5 वर्षांची होती. ती इयत्ता पहिलीत शिकत होती. गेल्या 2 वर्षांतील असा एकही दिवस नाही की आम्हाला तिची आठवण आली नाही. तिला परत पाठव अशी आम्ही देवाकडे सतत प्रार्थना करत होतो. देवानं आमची हाक ऐकली आणि पहलच्या जन्मदिनी म्हणजेच 14 एप्रिलला मला दुसरी मुलगी झाली.

असा झाला होता अपघात

हरिश मेहता यांनी सांगितले की जून 2019 मध्ये इनोव्हा कारमधून मी आणि माझे कुटुंबीय पलियाकला (जि. लखीमपुरखिरी,उत्तर प्रदेश) येथे आयोजित एका सत्संगासाठी जात होतो. या सत्संगाचं आयोजन गोरीवाला (सिरसा) येथील डेरा खुशपुर धामने केलं होतं. मी स्वतः गाडी चालवत होतो. मात्र सत्संगाला पोहोचण्यापूर्वी 13 जून 2019 च्या रात्री उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)पिलीभीत जिल्ह्यातील पूरनपूर येथे गाडीला अपघात झाला. सत्संग स्थळाकडे जाते वेळी पूरनपूर-खुटार महामार्गावर मोहनपूर जवळ एका टुरिस्ट बसने आमच्या इनोव्हाला धडक दिली. त्यावेळी लखनौवरुन येत असलेले पिलीभितचे जिल्हाधिकारी वैभव श्रीवास्तव यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना आपल्या गाडीतून पूरनपुर सीएचसीला पोहोचवले. मात्र तेथे जखमींवर उपचार करण्यास नकार देण्यात आला आणि पिलीभितला घेऊन जाण्यास सांगण्यात आले. परंतु,पिलीभित येथे उपचारादरम्यान माझी मुलगी पहल हिचा मृत्यू झाला. या अपघातात मी आणि माझी पत्नी सपना जखमी झालो. माझा मुलगा जय आणि ढुढियावाली (सिरसा) येथील माझा भाचा प्रिन्स थोडक्यात बचावले होते, असंही हरिश यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्या लहान मुलीचा जन्म पहलचाच पुनर्जन्म वाटत आहे.

First published: April 16, 2021, 4:35 PM IST
Tags: chandigarh

ताज्या बातम्या