चंदिगढ, 09 मे : एखाद्या कुटुंबात, समाजात वर्षानुवर्षे काही परंपरा सुरू असतात. काही कारणामुळे त्या सुरु झालेल्या असतात. पण त्या बदलल्या जात नाही. आता एका कुटुंबाने 350 वर्षांपूर्वीची परंपरा बंद केली. हरियाणातील हिसार जिल्ह्यात एका कुटुंबात मृतदेह दफन करण्याची पद्धत होती. आता त्याऐवजी अग्निसंस्कार करण्यास सुरुवात केली. कुटुंबियांचं म्हणणं आहे की, औरंगजेब मुळे त्यांच्या पुर्वजांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता.
दरम्यान, कुटुंबाने 350 वर्षांपूर्वीची परंपरा बंद केली असून एका वृद्ध महिलेवर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. त्यांच्या 30 कुटुंबातील लोकांचे मृतदेह याआधी दफन करण्यात येत होते. आता त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारून त्याच्या पंरपरांचे पालन कऱण्यास सुरुवात केली आहे.
वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी गावातील सर्व लोक उपस्थित होते. लोकांनी सांगितलं की, कोणत्याही दबावाशिवाय त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार धर्म स्वीकारला आणि हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले.
कुटुंबियांचे म्हणणे आहे की, औंरगंजेबाच्या काळात त्यांच्या पुर्वजांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. मात्र आता कोणाच्याही दबावाशिवाय हिंदू धर्मात प्रवेश केला. त्यामुळे दफनविधीची परंपरा सोडून मृतदेहाला मुखाग्नी दिला.
हे वाचा : महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 20000 पार; दिवसभरात 48 मृत्यू